भुवनेश्वर - ओडिशातील विविध जंगलात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आग लागल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभाग आणि वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळेच, राज्य सरकारने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष टास्क फोर्सचे गठन केले आहे. माजी पीसीपीएफ संदीप त्रिपाठी यांच्या नेतृत्त्वात ही टास्क फोर्स टीम काम करत आहे.
संदीप त्रिपाठी यांच्यासह या टास्क फोर्समध्ये एकूण 9 सदस्य असून तीन विशेष सदस्य हे हैदराबाद आणि डेहरादून येथून सहभागी झाले आहेत. जंगलात अचानक लागलेल्या आगीचे नेमके कारण काय, यापासून ते आग आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा कशाप्रकारे तैनात करता येईल, याबाबत टास्क फोर्स रणनिती आखत आहे. आगीवरील नियंत्रणासंदर्भात दररोज पत्रकार परिषदांचे आयोजन करुन जनतेपर्यंत ही माहिती पोहोचविण्यात येत आहे.
जंगलात लागलेल्या आगीत आत्तापर्यंत मोठ्या संख्येत वनसंपत्ती आणि वनस्पतींचं नुकसान झालंय. औषधी वनस्पती, वृक्ष, वेली आणि झाडे या आगीत भस्मस्थानी पडली आहेत. पीसीसीएफ जितेंद्र कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली. जंगलात आग लागने ही विशेष बाब नाही, कारण दरवर्षी जंगलात अशाप्रकारे आग लागली जाते. जंगलात आग लागणे ही नैसर्गिक प्रकिया आहे. ओडिशात लागलेली आग क्राऊन फायर नसून ग्राऊंड फायर आहे. त्यामुळे, उंच उंच झाडांना ही आग लागली नसून जमिनीवर लागली आहे. समिलीपाल येथे सध्या आग नियंत्रणात असून दुसरीकडे सिमलीपाल अभयारण्य आजही आगीत होरळपताना दिसत आहे. या परिसरात आग विस्तारत आहे, सिमलीपालपासून जवळच बारीपदा वनखंडच्या उदला, डुकरी, बांगिरीपोषी, रासगोविंदरपूर रेंजमधील जवळपास 20 पेक्षा अधिक भागांत ही आग पसरली आहे.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून 100 पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे. तर, बारीपंदा वनखंड परिसरातील सर्वच कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.