ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11- पाच राज्यांतील निवडणुकांचे कल जवळपास हाती आले आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अद्यापही मोदी लाट कायम असल्याचं या राज्यांच्या निकालावरून स्पष्ट झालं. उत्तर प्रदेशात तर भाजपाच्या विरोधात असलेल्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष यांचा सुपडासाफ झाला आहे. त्यानंतर मोदींचं हे अभूतपूर्व यश पाहून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 2019 विसरून 2024च्या निवडणुकीची तयारी करायला हवी, सध्या संपूर्ण भारतात मोदींसारखा दुसरा नेता नाही. असा कोणताही नेता नाही जो 2019मध्ये मोदी आणि भाजपाला टक्कर देऊ शकेल. उत्तर प्रदेशातील मोदी लाट तज्ज्ञ आणि विश्लेषक कसे काय विसरले ? हे छोट्या डबक्यातील तरंग नाही तर त्सुनामी आहे, असे ट्विटही ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. (स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी हे सर्वात ताकदवान नेते - अमित शाह)(प्रशांत किशोर यांच्या रणनीतीला अपयश, करिअरवर टांगती तलवार)उत्तर प्रदेशात समाजवादी आणि काँग्रेसची आघाडी झाली असली तरी मोदींनी 24 रॅली करून जोरदार प्रचार केला होता. त्यामुळेच उत्तर प्रदेशात भाजपाला घवघवीत यश मिळालं आहेत. तसेच शेजारील राज्य उत्तराखंडही भाजपानं जिंकलं आहे. मात्र पंजाबमध्ये 10 वर्षांनी काँग्रेस पुन्हा सत्तेत आली आहे. तसेच गोव्यातही प्रतिस्पर्धी भाजपावर मात करत काँग्रेस बहुमत मिळवण्याच्या जवळपास पोहोचली आहे. मात्र भाजपाचं हे यश दुर्लक्षित करण्यासारखं नसल्याचंही ते म्हणाले आहेत. मतदारांना एक चांगला पर्याय देण्याची गरज असल्याचंही मी आधीही म्हणालो आणि यानंतरही तेच सांगेन, असंही ओमर अब्दुल्ला म्हणाले आहेत.
At this rate we might as well forget 2019 & start planning/hoping for 2024.— Omar Abdullah (@abdullah_omar) March 11, 2017
Punjab, Goa & Manipur would certainly suggest that the BJP isn't unbeatable but strategy needs to shift from criticism to positive alternate— Omar Abdullah (@abdullah_omar) March 11, 2017
I've said this before & I'll say it again the voter needs to be given an alternative agenda that is based on what we will do better.— Omar Abdullah (@abdullah_omar) March 11, 2017
How the hell did almost all the experts/analysts miss this wave in UP? It's a tsunami not a ripple in a small pond.— Omar Abdullah (@abdullah_omar) March 11, 2017