शहरं
Join us  
Trending Stories
1
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
2
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
3
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
4
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
5
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
6
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
7
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
8
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
9
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
10
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
11
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
12
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
13
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
15
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
16
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
17
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
19
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
20
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 

बड्यांची कर्जे माफ करण्याचा ‘जुमला’

By admin | Published: November 16, 2016 1:26 AM

५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करून त्याऐवजी नव्या पर्यायी नोटा बदलून देण्याच्या मोदी सरकारच्या सध्या सुरू असलेल्या उद्योगाचा देशातील काळा पैसा

नवी दिल्ली : ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करून त्याऐवजी नव्या पर्यायी नोटा बदलून देण्याच्या मोदी सरकारच्या सध्या सुरू असलेल्या उद्योगाचा देशातील काळा पैसा बाहेर काढण्याशी काडीचाही संबंध नाही. बड्या कर्जबुडव्यांची कर्जे माफ करण्याचा सरकारचा हा कुटिल ‘जुमला’ आहे, असा आरोप काँग्रेसने मंगळवारी केला.काँग्रेसचे प्रवक्ते कपिल सिब्बल पत्रकार परिषदेत म्हणाले की, ज्या दिवशी या नोटा रद्द करण्याचा निर्णय झाला, तेव्हा देशात सुमारे १७ लाख कोटी रुपयांच्या चलनी नोटा होत्या. त्यापैकी ८६ टक्के म्हणजे सुमारे १३-१४ लाख कोटी रुपयांचे चलन ५०० व एक हजार रुपयांच्या स्वरूपात होते. म्हणजे या निर्णयाने १७ लाख कोटींपैकी १४ लाख कोटी रुपयांचे चलन काढून घेण्यात आले.सिब्बल म्हणाले की, सरकारनेच दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पाच दिवसांत सुमारे चार लाख कोटी रुपयांच्या रद्द झालेल्या नोटा बँकांमध्ये पुन्हा जमा झाल्या आहेत. आणखी काही दिवसांत हा आकडा १० लाख कोटी रुपयांवर जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. हे सर्व खरे मानले तरी त्यावरून सरकारच्या हेतूमागे काही तरी काळेबेरे असल्याचा संशय येतो.सिब्बल म्हणाले की, सरकार म्हणते त्याप्रमाणे रद्द झालेल्या १० लाख कोटी रुपयांच्या रद्द झालेल्या नोटा बँकांमध्ये परत आल्या, तरी चलनात सुमारे सहा लाख कोटी रुपयांची तूट राहिल. एवढ्या कमी चलनावर अर्थव्यवस्थेचा गाडा चालणे अशक्य असल्याने एवढ्या रकमेच्या नव्या नोटा छापाव्या लागतील. या नोटा जुन्या नोटांच्या बदली म्हणून नव्हे, तर नवे चलन म्हणून व्यवहारात आणाव्या लागतील. सरकारी बँकांच्या बुडित कर्जांची रक्कमही सहा लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. नव्या चलनाच्या रुपाने येणाऱ्या या पैशातून बँकांची भांडवली तूट भरून काढली जाईल. अशा प्रकारे लोकांच्या खिशातून पैसा काढून घेऊन त्यातून बड्या उद्योगपतींनी बुडविलेली बँकांची कर्जे माफ करण्याचा हा कुटिल डाव आहे, असा त्यांनी आरोप केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)सरकारवर विश्वास ठेवणे कठीण आहे, असे सांगून सिबल म्हणाले की, हा निर्णय घेताना सरकारने त्याच्या परिणामांचा कोणताही सारासार विचार केलेला नाही. सायंकाळी सहा वाजता रिझर्व्ह बँकेने सूचना केली, सात वाजता मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि रात्री आठ वाजता पंतप्रधानांनी घोषणा केली, एवढ्या झटपट हा निर्णय घेण्यात आला आहे. सिबल म्हणाले की, या निर्णयाची तयारी सहा महिने आधीपासून सुरू होती, असे सरकार सांगते. तसे असेल तर आता चलनात आणलेल्या नव्या नोटांवर रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांची स्वाक्षरी कशी? उर्जित पटेल तर ६ सप्टेंबर रोजी गव्हर्नर झाले. नव्या नोटा छापण्याचे पूर्वीच ठरले होते तर त्यांच्यावर त्यावेळचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांची स्वाक्षरी कशी नाही, असे सवालही त्यांनी केले.

कायदा पूर्णपणे धाब्यावर-सरकारने घेतलेला हा निर्णय व त्या अनुषंगाने योजलेले उपाय यांना कायद्याचा काडीमात्र आधार नाही, असा दावा करून सिबल म्हणाले की, याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आल्या असून, तेथे आपण स्वत:च युक्तिवाद करीत आहोत. प्रत्येक नागरिक लबाड आहे, त्याच्याकडील ५०० किंवा एक हजार रुपयांची प्रत्येक नोट वाममार्गाने कमावलेली आहे, असे सरकार सरसकट कसे गृहित धरू शकते. स्वत:चे पैसे खात्यातून हवे तेवढे व हवे तेव्हा काढून घेण्यास सरकार कसे काय रोखू शकते?

हेच का ते अच्छे दिन? - चिदंबरमलाखो लोक जुन्या चलनी नोटा बदलण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी बँकांसमोर रांगा लावत आहेत. हेच का ते ‘अच्छे दिन’ असा टोला माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी मोदी सरकारला लगावला. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला. पैशांसाठी लोक लांब रांगेत तासन्तास उभे राहणार असतील तर उत्पादकतेचे काय होईल, असा सवाल त्यांनी केला.