नवी दिल्ली - भारत 2030 पर्यंत प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करू शकतो, असे अमेरिकेच्या एका माजी उच्च राजदूताने म्हटले आहे. ते म्हणाले, जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही एकत्रीतपणे खूप काही करू शकतात. रिचर्ड वर्मा असे या माजी उच्च राजदुताचे नाव आहे. ते म्हणाले, "मी 2030 कडे पाहतो आणि मला एक भारत दिसतो, जो साधारणपणे प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करू शकेल." (Former American envoy counts says India become the best country in the world by 2030 )
रिचर्ड वर्मा म्हणाले, सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देश, सर्वाधिक महाविद्यालयीन पदवीधर, सर्वात मोठा मध्यमवर्ग, सर्वाधिक सेल फोन आणि इंटरनेट वापरकर्ते, तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लष्करी ताकद आणि तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये 25 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या 60 कोटी लोक आहेत.
आज भारत मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विकासाच्या बाबतीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. पुढील दशकात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे 2 ट्रिलियन डॉलर एवढा खर्च केला जाईल. 2030 साठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा बराचसा भाग अद्याप तयार करणे बाकी आहे. यामुळे आज एकट्यानेच 100 नवीन विमानतळांची योजना अथवा बांधणी केली जात आहे, असे वर्मा म्हणाले.
जिंदाल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बँकिंग अँड फायनान्समध्ये तरुणांना संबोधित करताना भारतातील अमेरिकेचे माजी राजदूत म्हणाले, आशियातील काम करणारा सर्वात तरुण वर्ग भारतात आहे. 2050 पर्यंत याचा आपल्याला फायदा होत राहील, असे वर्मा म्हणाले, ते 'ड्रायव्हिंग शेअर्ड समृद्धी - अमेरिका-भारत संबंधांसाठी 21 व्या शतकातील प्राधान्य' या विषयावर ते बोलत होते.
"आम्ही या युगाची सुरुवात 2000 मध्ये राष्ट्रपती क्लिंटन यांच्या भारत दौऱ्याने करतो. अनेक दशके काहीसे दूर राहून तसेच कधी कधी वेगळे राहूनही हा एक यशस्वी प्रवास ठरला." वर्मा पुढे म्हणाले, आता संबंध अधिक वृद्धींगत करण्याची वेळ आली आहे.
वर्मा म्हणाले, "भारत महामारीचा सामना करत आहे. दहशतवादाचा सामना करत आहे. असे असतानाही, तो नवीन शोध आणि उपाय बाजारात आणत आहे. जेणे करून, लोकांचे जीवन सोपे, सुरक्षित, समृद्ध, अधिक समावेशक आणि अधिक सुरक्षित होईल." वर्मा असेही म्हणाले, की त्यांनी जेव्हा भारताच्या प्रत्येक राज्याला भेट दिली, तेव्हा भारताच्या अशा वृद्धीचे चित्र त्यांनी पाहिल्यांदाच पाहिले. यामुळेच मी तुम्हा सर्वांच्या बाबतीत अत्यंत उत्सुक आहे. तुमच्या बोटावर जग आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये तुमच्या देशाचे स्थान सर्वात पुढे असेल. तुमचे व्यवसाय जागतिक स्तरावर आर्थिक वाढ आणि नावीन्यपूर्णतेला शक्ती देत राहतील. तुम्हाला आज आणि भविष्यात कोणती भूमिका साकारायची आहे, ते तुम्ही सर्व जण निवडू शकता. "