Soli Sorabjee: देशाचे माजी अॅटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 10:33 AM2021-04-30T10:33:05+5:302021-04-30T10:39:16+5:30
Soli Sorabjee Death: सोली सोराबजी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये (तेव्हाचे बॉम्बे हाय कोर्ट) १९५३ मध्ये वकीली सुरु केली होती. १९७१ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे वरीष्ठ वकील बनले. ते मानवाधिकारांसाठीचे वकील म्हणून ओळखले जात होते.
देशाचे माजी अॅटॉर्नी जनरल सोली सोराबजी (Soli Sorabjee) यांचे आज निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी लढत होते. सोली सोराबजी १९८९-९० आणि १९९८ ते २००४ असे दोनवेळा अॅटॉर्नी जनरल होते. (Former Attorney General for India and veteran jurist, Soli Sorabjee passed away on Friday morning, aged 91)
सोली सोराबजी यांचा जन्म १९३० मध्ये मुंबईमध्ये झाला होता. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये (तेव्हाचे बॉम्बे हाय कोर्ट) १९५३ मध्ये वकीली सुरु केली होती. १९७१ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे वरीष्ठ वकील बनले. ते मानवाधिकारांसाठीचे वकील म्हणून ओळखले जात होते. १९९७ मद्ये युएनने त्यांची नायजेरियामध्ये नियुक्ती केली होती. 1998 ते 2004 पर्यंत ते मानवाधिकार प्रोत्साहन व संरक्षण या विषयावर यूएन-सब कमिशनचे सदस्य आणि नंतर अध्यक्ष बनले. त्यांनी हेग येथे 2000 ते 2006 पर्यंत कायमस्वरुपी लवाद लवादाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.
Former Attorney General of India, Soli Sorabjee passes away at the age of 91 years.
— ANI (@ANI) April 30, 2021
(File photo) pic.twitter.com/FB3ATuisz8
मार्च २००२ मध्ये त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. बोलण्याचे स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचे संरक्षण यामध्ये उल्लेखनीय काम केल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.