शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

BCCI च्या माजी अध्यक्षांच्या कंपनीवर ईडीचा छापा; इंडिया सिमेंटच्या 'रेकॉर्ड'ची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 1:52 PM

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष आहेत.

N Srinivasan Net Worth: तामिळनाडूतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या कंपनीवर छापा टाकला आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष आहेत. इंडिया सिमेंट ही देशातील सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे. महसुलाच्या बाबतीत शेअर बाजारात सूचिबद्ध असलेली ही देशातील नवव्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. 

इंडिया सिमेंटचे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे ७ प्लांट आहेत. विशेष बाब म्हणजे २००८ ते २०१४ पर्यंत इंडिया सिमेंट्सकडे इंडियन प्रीमिअर लीगची (IPL) फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जची थेट मालकी होती. ईडीने मोठी कारवाई करत बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या कंपनीवर छापा टाकला. ईडीच्या चेन्नईतील टीमने इंडिया सिमेंट्सच्या विविध ठिकाणांवर छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीच्या छापेमारीमुळे एन. श्रीनिवासन यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, इंडिया सिमेंटच्या रेकॉर्डची पडताळणी सुरू आहे. 

इंडिया सिमेंट्सवर छापाईडी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सातत्याने कारवाई करत आहे. राजकारण्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत कारवाई होत आहे. दुसरीकडे, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. जमीन घोटाळ्याच्या आरोपांमुळे हेमंत सोरेन यांना झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता ते ईडीच्या ताब्यात आहेत. याप्रकरणी तपास यंत्रणेने अद्याप त्यांची अधिक चौकशी केलेली नाही.  

विरोधकांचे आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची देखील ईडी चौकशी सुरू आहे. दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. आतापर्यंत तपास यंत्रणेने त्यांना ५ वेळा चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने गुरुवारी पाठवलेल्या समन्समध्ये अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आता यावेळी केजरीवाल चौकशीसाठी हजर होतात की नाही हे पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूChennaiचेन्नईBCCIबीसीसीआयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय