शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘जननायक’ ‘भारतरत्न’...मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी मारली होती सत्तेला लाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 8:21 AM

बिहारचे माजी मुख्यमंत्री स्व. कर्पूरी ठाकूर यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहीर झाला.

मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठीच्या शिफारसींना विरोध झाला म्हणून सत्तेला लाथ मारणारे बिहारचे माजी मुख्यमंत्री स्व. कर्पूरी ठाकूर यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहीर झाला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने ही घाेषणा केली. ‘जननायक’ म्हणून त्यांना ओळखले जात हाेते.  कर्पूरी ठाकूर हे २२ डिसेंबर १९७० ते २ जून १९७१ आणि २४ जून १९७७ ते २१ एप्रिल १९७९ या कालावधीत दाेन वेळा बिहारचे मुख्यमंत्री हाेते. त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही हाेती. त्यांचा जन्म समस्तीपूर जिल्ह्यातील पिताैझिया गावात झाला हाेता. ‘छाेडाे भारत’ चळवळीदरम्यान ते २६ महिने तुरुंगात हाेते.

प्रथमच बिगर काॅंग्रेसी सरकार केले स्थापनशिक्षक असलेले ठाकूर हे १९५२ मध्ये साेशलिस्ट पार्टीच्या तिकिटावर सर्वप्रथम बिहार विधानसभेवर ताजपूर मतदारसंघातूननिवडून गेले. त्यांच्या नेतृत्वात १९६७च्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त साेशलिस्ट पार्टी माेठ्या ताकदीने उभी राहिली हाेती. त्यामुळेच बिहारमध्ये प्रथमच बिगर काॅंग्रेसचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी कर्पूरी ठाकूर उपमुख्यमंत्री बनले.

मुख्यमंत्री हाेते, मुलीसाठी टॅक्सीने गेलेकर्पूरी ठाकूर हे गरीब नेते म्हणून ओळखले जायचे. भत्त्यांशिवाय एकही अतिरिक्त रुपया त्यांनी घेतला नाही. त्यांच्या मुलीसाठी मुलगा बघण्यासाठी त्यांना रांची येथे जायचे हाेते. मुख्यमंत्री असूनही त्यांनी सरकारी वाहन न घेता टॅक्सीचा वापर केला.  

विमानही उतरु दिले नाहीपत्नीच्या इच्छेखातर मूळ गावी मुलीचा विवाह झाला. विवाहासाठी माेजक्या कुटुंबियांनाच बाेलावले हाेते. एवढेच नव्हे, तर त्या दिवशी दरभंगा आणि सहरसा येथील विमानतळांवर एकही विमान उतरणार नाही, असे त्यांनी आदेश दिले हाेते. जेणेकरुन काेणीही नेता लग्नाला येणार नाही. मुख्यमंत्री गावात असल्याचे पाेलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दाेन दिवसांनी कळाले. ते गावी पाेहाेचले तेव्हा एवढा साधा माणूस मुख्यमंत्री असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला हाेता. 

म्हणून बनले ‘जननायक’कर्पूरी ठाकूर यांनी अनेक आंदाेलने केली. त्यांचा संबंध थेट जनतेशी हाेता. त्यासाठी अनेकदा त्यांना तुरुंगात जावे लागले. मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांना ‘जननायक’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते हिंदी भाषेचे पुरस्कर्ते हाेते. शिक्षण मंत्री असताना त्यांनी इंग्रजी हा अनिवार्य विषय म्हणून दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमातून वगळला हाेता. बिहारच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीमुळे नुकसान हाेत असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले, असे त्यावेळी बाेलले गेले. 

‘तपस्येचे फळ मिळाले’कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर पुत्र रामनाथ ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला. बिहारच्या जनतेच्यावतीने आभार मानले. आम्हाला ३६ वर्षांच्या तपस्येचे फळ मिळाले, असे ते म्हणाले.

टॅग्स :BiharबिहारCentral Governmentकेंद्र सरकार