Amarinder Singh Joins BJP:पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला. नरेंद्र सिंह तोमर आणि किरेन रिजिजू या मंत्र्यांनी त्यांना भाजपचे सदस्यत्व मिळवून दिले. कॅप्टन अमरिंदर यांनी त्यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेसचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण केले आहे. अमरिंदर यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारीही भाजपमध्ये दाखल झाले.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या समर्थकांशी चर्चा केल्याचे सांगितले. पंजाबचे भविष्य पाहायचे असेल तर भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल, असा एकमताने निर्णय घेण्यात आला. आमची आणि भाजपची विचारधारा एकच असल्याचेही ते म्हणाले.
निवडणुकीपूर्वी काँग्रेसपासून फारकतअमरिंदर सिंग यांनी 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसपासून फारकत घेतली होती. यानंतर त्यांनी 2022 च्या निवडणुकीसाठी पंजाब लोक काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि नंतर भाजपसोबत एकत्र निवडणूक लढवली. मात्र, आम आदमी पक्षाच्या झंझावातापुढे भाजप आणि अमरिंदर सिंग फिके पडले.
भाजप एका मजबूत शीख चेहऱ्याच्या शोधात होतापंजाबमध्ये अकाली दलापासून फूट पडल्यानंतर भाजपला पंजाबमध्ये बऱ्याच काळापासून मोठ्या शीख चेहऱ्याची गरज होती. आता अमरिंदर सिंग यांच्या मार्फत भाजप पंजाबमध्ये पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न करेल. कॅप्टन अमरिंदर सिंग हे भाजपच्या दोन्ही सूत्रांमध्ये तंतोतंत बसतात, कारण ते पंजाबच्या राजकारणातील अनुभवी नेते आहेत आणि त्यांची राज्यातील शीख आणि हिंदू समुदायांमध्ये मजबूत पकड आहे.