कन्नौज : समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी कन्नौजमधील बस अपघातातील जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी 'तुम्ही एक लहान कर्मचारी आहात, येथून बाहेर जा', असे रुग्णालयात जखमींच्या बाजूला उभे असलेल्या डॉक्टरांना अखिलेश यादव यांनी म्हटले.
अखिलेश यादव रुग्णालयात जखमींकडून घटनेची माहिती घेत होते. त्यावेळी बाजूला उभे असलेले डॉक्टर काहीतरी भाष्य करत होते. त्याचवेळी अखिलेश यादव यांनी डॉक्टरांचे बोलणे थांबविले आणि म्हणाले, "तुम्ही बोलू नका, तुम्ही सरकारी माणूस आहात. आम्हाला माहीत आहे, काय असते सरकार. तुम्ही सरकारी माणूस आहात म्हणून बोलू नका. तुम्ही बोलले नाही पाहिजे."
यापुढे अखिलेश यादव म्हणाले, "तुम्ही सरकारच्या बाजूने बोलू शकत नाही. तुम्ही खूप लहान कर्मचारी आहात. आरएसएसचे होऊ शकता, भाजपाचे होऊ शकता. मात्र, मला समजू शकत नाही. यानंतर अखिलेश यादव यांनी डॉक्टरांना बाहेरच्या रस्ता दाखवत म्हणाले, "एक पाऊल मागे राहा येथून, बाहेर जा येथून."
अखिलेश यादव यांनी कन्नौजमध्ये जाऊन बस अपघातातील जखमींकडून घटनेची माहिती घेतली. यावेळी अखिलेश यादव यांनी घटनास्थळावर पोहोचून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव यांनी भाजपा सरकारवर जोरदार निशाणा साधत बस मालक आणि चालक भाजपाचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले.
दरम्यान, गेल्या शुक्रवारी रात्री उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये प्रवासी बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात भीषण टक्कर होऊन झालेल्या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 21 जण जखमी झाले. अपघातग्रस्त बस कन्नौजमधील गुरसहायगंज येथून जयपूरला जात होती. मात्र वाटेत झालेल्या भीषण अपघातानंतर बसला आग लागली. अपघाताची तीव्रता आणि लागलेली आग इतकी भीषण होती की त्यामुळे बसमधून प्रवास करत असलेल्या अनेक प्रवाशांना बसमधून बाहेरही पडता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Elections : 'आप' विरोधात भाजपाचा 500 कोटींचा दावा
'आज के शिवाजी' पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना- शिवसेना
संतप्त शिवप्रेमींच्या तीव्र निदर्शनानंतर ‘आज के शिवाजी’ पुस्तक घेतले मागे
मोदी-शाह-डोवालांच्या फोटोंवर क्रॉस, प्रज्ञा सिंह ठाकूरांना मिळाले संशयित पत्र