पंतप्रधान मोदींच्या महाबैठकीपूर्वी जम्मूत निदर्शनं; मुफ्तींच्या पाकिस्तानवरील वक्तव्याचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 12:31 PM2021-06-24T12:31:37+5:302021-06-24T12:34:03+5:30
Mehbooba Mufti Pakistan Comment : जम्मूमध्ये मेहबुबा मुफ्तींविरोधात निदर्शनं. पाकिस्तानवरील वक्तव्यावरून होतोय विरोध.
जम्मू काश्मीवरबाबत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज एक मोठी बैठक पार पडणार आहे. यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरूवारी जम्मू काश्मीरमध्ये डोगरा फ्रन्टकडून जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्की यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली.
जम्मू काश्मीर प्रकरणी पाकिस्तानसोबत चर्चा करण्याचं वक्तव्य मेहबूबा मुफ्ती यांनी केलं होतं. याच्याच विरोधात गुरूवारी डोगरा फ्रन्टच्या लोकांनी या ठिकाणी विरोधात निदर्शने केली. यावेळी डोगरा फ्रन्टच्या लोकांनी मेहबुबा मुफ्तींच्या विरोधात घोषणाबाजी केली, तसंच त्यांना तुरुंगात पाठवण्याचीही मागणी केली.
आज दुपारी तीन वाजता पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जम्मू काश्मीरबाबत मोठी बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीत फारूख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह जम्मू काश्मीरमधील अन्य नेतेही सहभागी होणार आहेत. त्यापूर्वीच सकाळी हे आंदोलन करण्यात आलं.
J&K: Dogra Front stages protest against Peoples Democratic Party chief Mehbooba Mufti in Jammu
— ANI (@ANI) June 24, 2021
"This protest is against Mufti's statement which she gave after Gupkar meeting that Pakistan is a stakeholder in Kashmir issue. She should be put behind bars," says a protester pic.twitter.com/Mea8if43se
डोगरा फ्रन्टशिवाय युनायटेड जम्मू नावाच्या संघटनेनंही जम्मूमध्ये निदर्शनं केली. परंतु हे निदर्शन मोदी सरकार विरोधात करण्यात आलं. यामध्ये जम्मू काश्मीरबाबतच्या बैठकीत गुपकार संघटनेला बोलावणं आणि जम्मू क्षेत्रातील संघटनेला न बोलावण्याचा विरोध करण्यात आला.