जम्मू काश्मीवरबाबत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज एक मोठी बैठक पार पडणार आहे. यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरूवारी जम्मू काश्मीरमध्ये डोगरा फ्रन्टकडून जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्की यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली.
जम्मू काश्मीर प्रकरणी पाकिस्तानसोबत चर्चा करण्याचं वक्तव्य मेहबूबा मुफ्ती यांनी केलं होतं. याच्याच विरोधात गुरूवारी डोगरा फ्रन्टच्या लोकांनी या ठिकाणी विरोधात निदर्शने केली. यावेळी डोगरा फ्रन्टच्या लोकांनी मेहबुबा मुफ्तींच्या विरोधात घोषणाबाजी केली, तसंच त्यांना तुरुंगात पाठवण्याचीही मागणी केली.
आज दुपारी तीन वाजता पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जम्मू काश्मीरबाबत मोठी बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीत फारूख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह जम्मू काश्मीरमधील अन्य नेतेही सहभागी होणार आहेत. त्यापूर्वीच सकाळी हे आंदोलन करण्यात आलं.