देहरादून: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री व देहरादूनचे माजी खासदार रमेश पोखरियाल निशांक यांची कन्या श्रेयसी ही लष्करी सेवेत दाखल झाली आहे. लष्कराच्या वैद्यकीय विभागात तिची कॅप्टनपदी निवड झाली आहे. तिला सध्या हरिद्वारच्या रुरकी येथील लष्करी रुग्णालयात पोस्टिंग देण्यात आली आहे. रमेश पोखरियाल निशांक यांनी ट्विट करून आपल्या लेकीच्या अभिमानास्पद कामगिरीची माहिती सर्वांना दिली. या ट्विटसोबत त्यांनी श्रेयशीच्या गणवेशावर स्टार लावतानाचा फोटोही पोस्ट केला आहे. श्रेयशीने ऋषिकेश येथून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती मॉरिशस येथे गेली होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रेयशीला मॉरीशस येथे मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर होती. पण तिने सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांकडून तिच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांनीही लष्करात निवड झाल्याबद्दल श्रेयशीचे अभिनंदन केले.
'या' माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी झाली लष्करी सेवेत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 10:13 AM