शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

“राहुल गांधींना शक्ती अन् भक्ती काय आहे, हेच माहिती नाही”; माजी काँग्रेस नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 3:18 PM

Congress Acharya Pramod Krishnam: राहुल गांधी यांनी एकदाच स्पष्ट शब्दांत सांगायला हवे की, ते भाजपाविरोधात आहेत की हिंदू धर्माविरोधात आहेत, अशी विचारणा माजी काँग्रेस नेत्याने केली आहे.

Congress Acharya Pramod Krishnam: भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईत सांगता करताना झालेल्या एका मोठ्या सभेत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि काँग्रेस पक्ष सोडलेल्या नेत्यांवर टीका केली. राहुल गांधी यांच्यावर भाजपाकडून पलटवार होत असताना काँग्रेसच्या माजी नेत्यांनी राहुल गांधी यांना काही प्रश्न विचारले आहेत.

राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. देशातील ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थांमध्ये राजाचा आत्मा आहे. ईव्हीएम शिवाय राजा निवडणूक जिंकू शकत नाहीत. निवडणूक आयोगाला आम्ही सांगितले विरोधी पक्षांना या मशिन खोलून दाखवा, त्या कशा चालतात ते आमच्या तज्ज्ञांना दाखवा. मशिनमधून जी कागदाची चिठ्ठी निघते, त्याची मोजणी करा, पण निवडणूक आयोग नाही म्हणते. या सिस्टिमला त्याची मोजणी नको आहे. लोक विचार करतात की, आम्ही सगळे भाजपविरोधात, नरेंद्र मोदी या एका व्यक्तीविरोधात लढत आहोत, पण तसे नाही. आमची लढाई एका व्यक्तीविरोधात नाही, तर एका शक्तीविरोधात आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. यावर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी टीका केली.

राहुल गांधींना शक्ती आणि भक्ती काय आहे, आदिशक्ती काय आहे, हेच माहिती नाही

राहुल गांधींना स्वतःलाच माहिती नाही की, ते काय बोलत आहेत. राहुल गांधींना हेही माहिती नाही की, ते असे का बोलत आहेत. पण राहुल गांधींना त्याचे काही नाही. राहुल गांधींना शक्ती आणि भक्ती काय आहे, आदिशक्ती काय आहे, हेच माहिती नाही. राहुल गांधी यांच्या आजूबाजूला असे काही लोक आहे, जे त्यांना बरबाद करत आहेत. त्यांना कोणीतरी एखादा कागद हातात देते आणि ते विमानात बसून वाचतात. खाली उतरल्यावर काय वाचले हे त्यांच्या कधी लक्षात राहते, कधी ते विसरतात. आपण जे बोलतो ते का बोलतो, त्याचा अर्थ काय, याचा विचार सर्वांत आधी राहुल गांधी यांनी करायला हवा, असे आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटले आहे.

दरम्यान,  राहुल गांधी हिंदुत्वाविरोधात लढू इच्छितात का, हिंदुत्वाची शक्ती संपुष्टात आणू पाहतात का, सनातनाविरोधात लढायचे आहे का, असा सवाल करत, एकदाच काय ते राहुल गांधी यांनी स्पष्ट शब्दांत सांगायला हवे की, ते भाजपाविरोधात आहेत की हिंदू धर्माविरोधात आहेत, अशी विचारणा आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस