पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य विचारुन पात्रांची उडवली होती झोप, तेच गौरव वल्लभ भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 01:35 PM2024-04-04T13:35:48+5:302024-04-04T13:38:05+5:30

लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पक्षाचा आधी राजीनामा दिला.

Former Congress leader Gourav Vallabh joins BJP, in the presence of BJP General Secretary Vinod Tawde | पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य विचारुन पात्रांची उडवली होती झोप, तेच गौरव वल्लभ भाजपात

पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य विचारुन पात्रांची उडवली होती झोप, तेच गौरव वल्लभ भाजपात

लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पक्षाचा आधी राजीनामा दिला. आता गौरव वल्लभ यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गौरव वल्लभ यांनी पक्षाला राजीनामा देताना म्हणाले, सनातनविरोधी घोषणाबाजी करु शकत नसल्याचे सांगितले. 

शिंदे गटाचे हेमंत पाटील बंडखोरी करणार का? तिकीट कापल्यानंतर पाटलांनी स्पष्टच सांगितलं

 गौरव वल्लभ यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे.  भाजपमध्ये प्रवेश करताना वल्लभ म्हणाले, 'माझ्या मनातील सर्व वेदना मी राजीनामा पत्रात लिहून ठेवल्या होत्या, ज्या मी वेळोवेळी काँग्रेस पक्षाला सांगितल्या होत्या. प्रभू रामाचे मंदिर बांधले पाहिजे आणि आम्हाला आमंत्रण मिळाले आणि आम्ही ते आमंत्रण नाकारले तर काँग्रेस पक्षाने आम्ही जाऊ शकत नाही, असे लिहून द्यावे, मी हे स्वीकारू शकत नाही, असे माझे नेहमीच मत आहे, असंही गौरव वल्लभ म्हणाले.

गौरव वल्लभ म्हणाले, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. मी दीर्घकाळ देशाच्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये अर्थशास्त्र आणि वित्त विषय शिकवले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा दुरुपयोग, त्या धोरणांचा दुरुपयोग, उदारीकरणाचा गैरवापर, खाजगीकरण, जागतिकीकरणाचा दुरुपयोग. मनमोहन सिंग आणि नरसिंह राव यांनी जे केले, त्या धोरणांचा दुरुपयोग सारे जग स्वीकारते. कोणी त्याचा व्यवसाय केल्याबद्दल शिवीगाळ करतो, कोणी निर्गुंतवणुकीसाठी शिवीगाळ करतो, कोणी एअर इंडिया विकत घेतल्याबद्दल शिवीगाळ करतो. मला वाटतं त्याच्याशी सामना करण्यात काँग्रेस पक्षात काही अंतर आहे. मी पत्रातही तेच लिहिले आहे. 

भाजपाच्या संबित पात्रा यांना पाच ट्रिलियनवरुन केले होते ट्रोल

काँग्रेस पक्षात गौरव वल्लभ प्रवक्ते म्हणूनच जास्त प्रसिद्ध झाले होते. चर्चेदरम्यान गौरव वल्लभ यांनी भाजप नेते संबित पात्रा यांना प्रश्न विचारून धक्का दिला होता. संबित पात्रा यांनी चर्चेत मोदी सरकारच्या ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याबद्दल बोलले. यानंतर काँग्रेसच्या वतीने गौरव वल्लभ यांनी पात्रा यांना ५ ट्रिलियनमध्ये किती शून्य आहेत हे माहित आहे का, असा प्रश्न केला. दोन-तीन वेळा विचारल्यानंतर पात्रा यांनी प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा गौरव वल्लभ यांनीच सांगितले की ५ ट्रिलियनमध्ये १२ शून्य असतात. याबाबतची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. 

Web Title: Former Congress leader Gourav Vallabh joins BJP, in the presence of BJP General Secretary Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.