ज्येष्ठ विधिज्ञ आणि राजकारणी कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी दिली. तसंच राज्यसभेसाठी सिब्बल यांना समाजवादी पक्षानं समर्थन दिलं आहे. दरम्यान, त्यांनी यापूर्वीही काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्याची मागणी केली होती. परंतु आता त्यांनी आपल्या काँग्रेसमधून बाहेर पडण्यावर भाष्य केलं आहे. कपिल सिब्बल हे समाजवादी पक्षाच्या समर्थनानं अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेवर जाणार आहेत.
“माझी अखिलेश यादव यांच्यासोबत चर्चा झाली. अनेक पक्ष माझ्याकडे आले आणि त्यांनी पक्षासोबत जोडले जाण्याची विनंती केली. परंतु मी ना भाजपत जाणार ना आणि कोणत्या पक्षात जाणार असं मी यापूर्वीच सांगितलं होतं. मी सार्वजनिकरित्या बोललो होतो. अशातच मी कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही,” असं सिब्बल म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. जर पाठिंबा असेल तर मी राज्यसभेसाठी अर्ज दाखल करू शकतो. तुम्हाला योग्य वाटलं तर पाठिंबा द्या. यावर त्यांनी तुमच्यासारखे लोक कोणत्याही पक्षात नसले तरी आम्हाला राज्यसभेत हवे असल्याचं त्यांनी म्हटलं असंही ते म्हणाले.
मोठा कालावधी गेल्यानंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचं कारण सिब्बल यांना विचारण्यात आलं. यावर बोलताना त्यांनी कोणत्याही पक्षाशी नातं हे नियुक्त करणारा आणि कर्मचारी असं नसतं, असंही ते म्हणाले. “३० वर्षांनंतर नव्या मार्गावर जावं असं मला वाटलं. हा माझा वैयक्तिक निर्णय होता. मला काँग्रेसबाबत कोणतीही तक्रार नाही किंवा नसेल. पक्षातील नेते माझी मित्र आहेत. जी काँग्रेसची विचारसरणी आहे मी त्याच्याशी जोडलेला राहीन. अपक्ष म्हणून विजयी ठरलो तर मी राज्यसभेत प्रवेश करेन. त्यांनी मला साथ दिली हा त्यांचा मोठेपणा आहे,” असंही ते म्हणाले.
माझ्या शुभेच्या त्यांच्यासोबत“मी नवा मार्ग स्वीकारला पाहिजे असं वाटलं. काँग्रेसचं सर्वकाही चांगलं चाललं आहे की नाही यावर मला भाष्य करायचं नाही. तो एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि माझ्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत. इतिहासात काय झालं यावर मला भाष्य करायचं नाही,” असं सिब्बल एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले.
अखिलेश यादव यांनी आपल्याला सिद्ध केलं आहे. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही होते असं ते अखिलेश यादव यांच्याबद्दल बोलताना म्हणाले. अपक्ष उमेदवाराच्या रुपात मी आवाज उठवत राहणार आहे. पक्षासोबत जोडले गेले असताना अनेकदा तुम्हाला आवाज उठवता येत नाही. जे पक्ष सांगतो तेच करावं लागतं. परंतु मला माझा आवाज उठवण्यासाठी पहिल्यांदा संधी मिळेल. जे माझ्या मनात आहे तेच मी बोलणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं.