माजी नगरसेवकाच्या ट्रॅक्टरने चार जणांना उडविले
By admin | Published: January 27, 2016 11:16 PM
जळगाव- जुने जळगावातील आंबेडकरनगरात अंत्ययात्रेसाठी आलेल्या दोन महिलांसह चौघांना ट्रॅक्टरने उडविले. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमींची प्रकृती बरी असून, त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जळगाव- जुने जळगावातील आंबेडकरनगरात अंत्ययात्रेसाठी आलेल्या दोन महिलांसह चौघांना ट्रॅक्टरने उडविले. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमींची प्रकृती बरी असून, त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. धडक देणारे ट्रॅक्टर हे माजी नगरसेवक आबा बाविस्कर यांच्या मालकीचे असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. तर ट्रॅक्टर युवक गणेश दंगल सोनवणे (वय १९) रा.वाल्मीकनगर हा चालवित होता. त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. अंत्ययात्रा गेल्यावर ट्रॅक्टर धडकलेआंबेडकरनगरात माजी नगरसेवक शालीक अप्पा सोनवणे यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी त्यांचे ठिकठिकाणचे नातेवाईक, आप्त आले होते. अंत्ययात्रा आंबेडकरनगरातून गेल्यानंतर महिला, काही पुरुष, युवक रस्त्याच्या कडेला उभे होते. यातच समोरून एक ट्रॅक्टर आले. त्याचा वेग कमी होता. पण ते महिलांच्या अंगावर आले. ते इतरांच्या दिशेने जाईल तोपर्यंत जगन्नाथ साळवे व शशिकांत अडकमोल यांनी ब्रेक दाबून ते थांबविले. ट्रॅक्टर थांबल्याने पुढील अनर्थ टळला. महिलेच्या पायावरून गेले चाकधु्रपदाबाई कौतिक अडकमोल रा.पंचशीलनगर भुसावळ यांच्या पायांवरून चाक फिरले. त्यात त्यांच्या तळपायांना गंभीर इजा झाली आहे. तर उषाबाई जगन्नाथ साळवे रा.रामानंदनगर यांच्या डोक्याला मार लागला. तसेच शशिकांत अडकमोल (वय ४०) व आशीष विनोद अडकमोल (वय १५ वर्षे) दोघे रा.पंचशीलनगर, भुसावळ हेदेखील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर लागलीच उपचार सुरू झाले. घटनेत कुणीही गंभीर जखमी झालेले नसून, सर्व जखमींची प्रकृती बरी असल्याचे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. शहर पोलिसांमधील कर्मचार्यांनी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची माहिती घेतली.