शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
3
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
4
आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याला गेले; हा एकच किस्सा रतन टाटांच्या कामाची पद्धत सांगून जातो
5
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
6
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
7
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
8
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
9
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...
10
बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
12
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट
13
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्च्या देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
14
'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
15
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
16
रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."
17
Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
18
Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!
19
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
20
असा माणूस पुन्हा होणे नाही! रतन टाटांच्या निधनानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली

माजी उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला 'चॅलेंज', अथणीत लक्ष्मण सवदींचा शड्डू; काट्याची टक्कर होणार

By श्रीनिवास नागे | Published: May 03, 2023 12:51 PM

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपचे कमळ बाजूला सारून काँग्रेसचा 'हात' हातात घेऊन शड्डू ठोकला

श्रीनिवास नागेअथणी (जि. बेळगाव) : अख्ख्या कर्नाटकातील भाजपच्या निशाण्यावर असलेल्या अथणी मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपचे कमळ बाजूला सारून काँग्रेसचा 'हात' हातात घेऊन शड्डू ठोकला आहे. 'हिंमत असेल तर मला पाडून दाखवा' असे आव्हान त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिले आहे. त्यामुळे भाजपचे आमदार महेश कुमठळ्ळी यांच्याशी त्यांची काट्याची लढत होत आहे.संपूर्ण कर्नाटक राज्याला नेत्यांचे पक्षांतर नवीन नाही. २०१८ मधील विधानसभा निवडणुकीत महेश कुमठळ्ळी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर तेव्हाच्या भाजपचे उमेदवार लक्ष्मण सवदी यांना केवळ २००० मतांनी अस्मान दाखवले होते. त्यानंतर भाजपने काँग्रेसच्या १७ आमदारांना फोडले. त्याचवेळी या १७ आमदारांना २०२३ मधील उमेदवारी द्यायचा वायदा भाजपने केला होता. त्यानुसार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या कुमठळ्ळी यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली.त्यासाठी माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. या दरम्यान २०१८ मधील पराभवानंतर सवदी यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवले होते, परंतु ते आता विधानसभेची उमेदवारी मागत होते. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर सवदींनी काँग्रेस गाठून तिकीट मिळवले. भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याने संपूर्ण राज्यातील पक्षाच्या नेत्यांनी अथणी मतदारसंघ लक्ष्य केला आहे.पाण्याचे राजकारणबेळगाव जिल्ह्याचे राजकारण जेथे शिजते, त्या अथणी मतदारसंघातील सिंचनाअभावी कोरडा राहिलेला भाग ४० टक्के आहे. महाराष्ट्रातून आलेल्या कृष्णा नदीचे पात्र फेब्रुवारी ते मे यादरम्यान कोरडे पडलेलेे असते. तेव्हा कोयना धरणातून चार टीएमसी कर्नाटकसाठी सोडावे, त्यासाठी लागणारी रक्कम भरण्याची तयारी आहे, असे कर्नाटक सांगते. दुसरीकडे कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून महाराष्ट्रातील जतच्या पूर्व भागाला पाणी द्यावे असा प्रस्ताव आहे, मात्र त्यावर कार्यवाही झालेली नाही. परिणामी दरवर्षी अथणी तालुक्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होतो.जिल्हा विभाजनाचे भिजत घोंगडेबेळगाव जिल्ह्यात विधानसभेचे १८ मतदारसंघ आहेत. जिल्हा विस्ताराने खूप मोठा आहे. अथणीपासून बेळगावचे अंतर दीडशे किलोमीटर आहे.त्यामुळे अथणी मतदारसंघाचे जवळच्या सांगलीशी बाजारपेठ, पै-पाहुणे या माध्यमातून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी आहे. परंतु राजकारणात हे घोंगडे भिजत पडले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने तो मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकbelgaonबेळगावbelgaum-pcबेळगावBJPभाजपाcongressकाँग्रेस