तोडफोडीच्या आरोपातून माजी जि.प. सदस्य दोषमुक्त
By admin | Published: March 23, 2017 5:17 PM
नागपूर : सुरेश भोयर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना, त्यांच्या कार्यकाळात जि.प.ची पहिली आमसभा सरपंच भवनात घेण्यात आली होती. जि.प.चे माजी सदस्य टेक चंद सावरकर, आनंदराव राऊत, देवेंद्र गोडबोले, योगेश वाडीभस्मे, अनिल निधान यांच्यावर सभागृहातील हजेरी रजिस्टर पळविणे, खुर्च्यांची तोडफोड करणे, माईक हिसकावणे व सभागृहाच्या कामकाजात अडचणी निर्माण करणे आदी आरोप लावून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात अति. मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी निर्वाळा दिला असून, पाचही माजी सदस्यांना आरोपातून दोषमुक्त केले आहे.