"तुम्ही लोकसेवक आहात...", मानहानीच्या प्रकरणावरून गौतम गंभीरला हायकोर्टाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 01:44 PM2023-05-18T13:44:07+5:302023-05-18T13:44:41+5:30
भाजप खासदार गौतम गंभीरने हिंदी वर्तमानपत्राविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे.
नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदारगौतम गंभीरने हिंदी वर्तमानपत्राविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. पंजाब केसरी या हिंदी वर्तमानपत्राविरूद्ध गंभीरने दिल्ली उच्च न्यायालयात हा खटला दाखल केला. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये भारताचा माजी खेळाडू लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. त्याने दिल्ली उच्च न्यायालयात २ कोटींची नुकसान भरपाई मागितली असून पंजाब केसरीविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या मानहानीच्या खटल्याविरुद्धच्या याचिकेवर अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. गंभीरच्या वकिलांनी दबाव टाकला असता न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांनी टिप्पणी करताना म्हटले, "तुम्ही लोकसेवक आहात. तुम्हाला इतके संवेदनशील असण्याची गरज नाही."
न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांनी समन्स बजावले
गौतम गंभीरने वकील जय अनंत देहरदाई यांच्या माध्यमातून दाखल केलेल्या खटल्यात पंजाब केसरी या वर्तमानपत्राकडून दोन कोटी रूपयांची भरपाई मागितली आहे. वृत्तपत्राचे मुख्य संपादक आणि तीन पत्रकारांची या खटल्यात नावे आहेत. न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांनी मुख्य प्रकरत णामीडिया हाऊस आणि इतर चार जणांना नोटीस आणि समन्स बजावले आहे.
'भस्मासुर'वरून वाद! हिंदी वर्तमानपत्रावर गौतम गंभीर संतापला; २ कोटींची नुकसान भरपाई मागितली
गंभीरने पंजाब केसरीविरूद्ध दाखल केलेल्या खटल्यात दिलेल्या बाबी खालीलप्रमाणे -
- खासदार गौतम गंभीर बेपत्ता सर्वत्र लागले पोस्टर.
- दिल्लीचे बेपत्ता खासदार लखनौ सुपर जायंट्ससाठी बनले भस्मासुर'.
- आदेश गुप्ता बोलत राहिले, गौतम गंभीर उठून गेला.