इस्त्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर यांचा भाजपामध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 02:52 PM2018-10-28T14:52:56+5:302018-10-28T14:53:25+5:30
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो)माजी अध्यक्ष माधवन नायर यांनी भारतीय जनता पार्टीत (भाजपा) प्रवेश केला आहे. शनिवारी रात्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा येथील कन्नूरमध्ये झाली.
त्रिवेंद्रम : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो)माजी अध्यक्ष माधवन नायर यांनी भारतीय जनता पार्टीत (भाजपा) प्रवेश केला आहे. शनिवारी रात्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा येथील कन्नूरमध्ये झाली. यावेळी अमित शहांच्या उपस्थितीत माधवन नायर यांच्यासह आणखी चार जणांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
माधवन नायर हे सहा वर्षे इस्रोचे अध्यक्ष होते. त्यांच्या काळात चांद्रयान मोहीम हाती घेण्यात आली होती. केरळमधील तिरुअनंतपुरम येथील मुळचे असलेले नायर यांनी 1966 मध्ये केरळ विश्वविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी मुंबईतील भाभा अनुसंधान केंद्रात प्रशिक्षण घेतले होते.
#Kerala: Former ISRO Chief Madhavan Nair joined Bharatiya Janata Party in the presence of party President Amit Shah, in Trivandrum yesterday. pic.twitter.com/W7KsZp75re
— ANI (@ANI) October 28, 2018
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून क्रीडा,चित्रपटासह अन्य क्षेत्रातील मातब्बर व्यक्तींना रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे. माधवन नायर यांच्या पार्टीप्रवेशाने भाजपाला बळ मिळण्याची शक्यता आहे.