कोची - केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते ओमन चांडी यांचे निधन झाले. केरळकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के सुधाकरण यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती माहिती दिली. तसेच, वरिष्ठ काँग्रेस नेते चांडी यांच्या निधनाने अतिव दुख झाल्याचेही त्यांनी म्हटले.
ओमान चांडी यांची प्रकृती गेल्या ४ वर्षांपासून खालावलेली होती. सन २०१९ साली त्यांच्या गळ्यासंबंधित आजार वाढल्याने त्यांना उपचारासाठी जर्मनीला नेण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, ओमान चांडी हे दोनवेळा केरळचे मुख्यमंत्री राहिले आहेत. सन १९७० साली त्यांनी विधानसभेला पुथुपल्ली मतदारसंघातून निवडून लढवत आमदारकी मिळवली होती.
काँग्रेस नेते के. सुधाकरण यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती देताना, अतिव दु:ख झाल्यचे म्हटलं आहे.