ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ४ - लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांचं निधन झालं आहे. ते 68 वर्षांचे होते. दिल्लीतील राहत्या घऱी ह्रद्यविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे. 1996 ते 1998 काळात पी ए संगमा 11 व्या लोकसभेचे अध्यक्ष होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत पी ए संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. मात्र 2004 मध्ये शरद पवार युपीएत समील झाल्यानंतर त्यानी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता.
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेत पी ए संगमा यांच्या निधनाची माहिती दिली. लोकसभेत पी ए संगमा यांना आदरांजली वाहिण्यात आली. आदरांजली वाहिल्यानंतर लोकसभेचं कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. लोकसभेचं कामकाज हसतमुखाने कसं कराव हे मी पी ए संगमा यांच्याकडून शिकल्याची भावना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. पी ए संगमा यांचा लोकसभा अध्यक्षपदाचा कार्यकाळ न विसरण्यासारखा असल्याचं मोदी बोलले आहेत.
पी.ए. संगमा यांच्या कारकिर्दीचा आढावा –
जन्म : 1 सप्टेंबर 1947
1973 : मेघालय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष
1977 : 6 व्या लोकसभेत तुरा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय
1988 : मेघालय राज्याचे मुख्यमंत्री
1996 ते 1998 काळात लोकसभेचे सभापती
1999 : सोनियांच्या परदेशीपणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून हकालपट्टी- शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना-
2004 : शरद पवार यूपीएत सामील झाल्यानं राष्ट्रवादीला रामराम
2005 : ममता बॅनर्जी यांच्याशी जुळवून घेत राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेसची स्थापना
2006 : पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले
Shri PA Sangma was a self-made leader whose contribution towards the development of the Northeast is monumental. Saddened by his demise.— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2016
Shri PA Sangma's tenure as Lok Sabha Speaker is unforgettable. His down to earth personality & affable nature endeared him to many.— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2016
Sangma ji was deeply influenced by Netaji Bose. Here's a programme both of us attended in 2012 on Azad Hind Fauj. https://t.co/Jbp1emCrVe— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2016