मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे निधन, आज अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 06:05 AM2019-11-25T06:05:54+5:302019-11-25T06:23:52+5:30
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश जोशी यांचे प्रदीर्घ आजारामुळे बन्सल रुग्णालयात रविवारी निधन झाले.
भोपाळ : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश जोशी यांचे प्रदीर्घ आजारामुळे बन्सल रुग्णालयात रविवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या मागे तीन मुले व तीन मुली, असा परिवार आहे.
ते हृदयविकार व मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त होते अशी माहिती त्यांचे पुत्र व माजी मंत्री दीपक जोशी यांनी दिली. कैलाश जोशी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांना आदरांजली वाहताना मोदी यांनी म्हटले आहे की, जनसंघ व भाजपला मजबूत करण्यात कैलाश जोशी यांचे मोठे योगदान आहे. मध्यप्रदेशच्या विकासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कैलाश जोशी यांच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर मध्यप्रदेशमधील देवास जिल्ह्यातल्या हतपिपाल्या या गावी सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रुग्णालयात जाऊन अंतिम दर्शन घेतले. (वृत्तसंस्था)