"खोटं जग, खोटी बंधनं..."; मंत्रीपद न मिळताच BJP आमदार भक्तीत तल्लीन, गायलं भजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 02:24 PM2024-01-25T14:24:02+5:302024-01-25T14:25:10+5:30

कपाळावर टिळा आणि भगवी वस्त्र परिधान करून माजी मंत्री भार्गव धार्मिक कार्यक्रमाला येणाऱ्या भाविकांना कथा सांगत आहेत आणि भजनही गात आहेत.

former minister and mp senior mla gopal bhargava appeared in the role of kathavachak in sagar | "खोटं जग, खोटी बंधनं..."; मंत्रीपद न मिळताच BJP आमदार भक्तीत तल्लीन, गायलं भजन

फोटो - आजतक

मध्य प्रदेशचेभाजपाचे आमदार आणि माजी मंत्री पंडित गोपाल भार्गव मंत्रीपद न मिळताच देवाच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसले. सागर जिल्ह्यातील रहली विधानसभेच्या पटेरिया गावात श्रीमद्भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात पंडित गोपाल भार्गव दिसले.

रहली विधानसभा मतदारसंघातील गडकोटा भागात असलेल्या पटेरिया गावात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये माजी मंत्री पंडित गोपाल भार्गव व्यास सिंहासनावर विराजमान आहेत. कपाळावर टिळा आणि भगवी वस्त्र परिधान करून माजी मंत्री भार्गव धार्मिक कार्यक्रमाला येणाऱ्या भाविकांना कथा सांगत आहेत आणि भजनही गात आहेत. या सोहळ्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

गोपाल भार्गव यांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. भजने गाणारे पंडित भार्गव म्हणाले, मी लहानपणी एक गाणं म्हणत असे. आता मी 50 वर्षांनंतर त्याची पुनरावृत्ती करत आहे. या गाण्याच्या काही ओळी अजूनही आठवतात. मी ते गाण्याचा प्रयत्न करेन. त्यावेळी आमदार भार्गव हे "खोटं जग, खोटी बंधनं, खोटी ही सर्व माया..." असं गात होते. 

गोपाल भार्गव हे 9 वेळा आमदार झाले आहेत. मध्य प्रदेशातीलभाजपा सरकारमध्ये 18 वर्षे मंत्री होते. 2018 मध्ये काँग्रेस सरकारच्या स्थापनेदरम्यान त्यांना विरोधी पक्षनेतेपदही देण्यात आले होते. निवडणूक प्रचारादरम्यान ते मुख्यमंत्रीपदासाठीही दावा करत होते. मात्र, यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थानही मिळू शकलं नाही. 
 

Web Title: former minister and mp senior mla gopal bhargava appeared in the role of kathavachak in sagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.