गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण येताना दिसतोय. दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीवरून विरोधकांकडून केंद्रावकर टीकेचा बाण सोडण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्रावर निशाणा साधला आहे. बुधवारी नैनिताल येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.हेही वाचा - देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणे अटळ, शास्त्रज्ञांचा दावा
"कोरोनाचं नियंत्रण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. मोदी सरकारकडे कोरोना विरोधात कोणत्याही प्रकारचं स्पष्ट धोरण नाही. यामुळेच आज देशातील परिस्थितीत बिकट होत चालली आहे. पूर्ण बहुमत असूनदेखील आज देशाच्या समोर नेतृत्वाचं संकट उभं राहिलं आहे," असं सिब्बल म्हणाले.
स्पष्ट धोरण आखण्यास सरकार अयशस्वी"देशातील कोरोनाची संसर्गाची परिस्थितीत हाताबाहेर देी आहे. सध्या दर आठवड्याला २० हडार लोकांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत सरकार कोरोनाविषयक स्पष्ट धोरण आखण्यास अयशस्वी ठरलं आहे. देशात आरोग्य सेवांच्या अभावामुळे अनेकजण कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. सरकार लोकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेडदेखील उपलब्ध करून देऊ शकत नाहीये," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.लढाई एकत्र लढायची आहेनुकत्या निकाल लागलेल्या पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभेच्या स्थितीवर उत्तर देताना सिब्बल यांनी या मुद्द्यांवर चर्चा करण्याची ही योग्य वेळ नसल्याचं सांगितलं. तसंच काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळावा या विषयावरही बोलण्यास त्यांनी नकार दिला. सध्या देशात कोरोनामुळे परिस्थिती बिकट आहे. कोरोना विरोधातील लढाई आपल्याला एकत्र लढायची आहे, असंही ते यावेळी म्हणाले.