... जेव्हा नाराज होऊन राजीव गांधी Amitabh Bachchan यांना म्हणाले होते 'साप'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 11:45 PM2021-07-03T23:45:23+5:302021-07-03T23:51:33+5:30

Amitabh Bacchhan and Rajiv Gandhi : एकेकाळी अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी यांच्यात होते उत्तम संबंध. परंतु हळूहळू दोन्ही कुटुंबांमध्ये वाढू लागला दुरावा. 

former pm ranjiv gandhi once called actor abhitabh bachchan snake book reveal story politics relations between families | ... जेव्हा नाराज होऊन राजीव गांधी Amitabh Bachchan यांना म्हणाले होते 'साप'

... जेव्हा नाराज होऊन राजीव गांधी Amitabh Bachchan यांना म्हणाले होते 'साप'

Next
ठळक मुद्दे एकेकाळी अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी यांच्यात होते उत्तम संबंध.परंतु हळूहळू दोन्ही कुटुंबांमध्ये वाढू लागला दुरावा. 

गांधी आणि बच्चन या कुटुंबांमध्ये अनेक दशकांपर्यंत उत्तम संबंध होते. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मैत्रीबाबत सर्वांनाच कल्पना आहे. अमिताभ बच्चन यांना राजकारणात राजीव गांधींनीच आणलं होतं. परंतु कालांतरानं दोन्ही कुटुंबांमधील दुरावा हा वाढत गेला. ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार संतोष भारतीय यांनी 'वीपी सिंह, चंद्रशेखर, सोनिया गांधी और मैं' या नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. संतोष भारतीय यांच्यानुसार राजीव गांधी हे अमिताभ यांच्यापासून इतके नाराज झाले की त्यांनी त्यांना थेट सापही म्हटलं. 

पुस्तकात लिहिल्यानुसार दोघांमध्येही दुरावा तेव्हा वाढत गेला जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंह पंतप्रधान बनले. एका घटनेचा उल्लेख करताना पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे की एकवेळ त्यांच्यात इतका दुरावा आला तेव्हा एकदा राजीव गांधी यांनी त्यांना सापही म्हटलं. भारतीय यांनी लिहिलेल्या माहितीनुसार राजीव गांधी हे त्यावेळी विरोधीपक्ष नेते होते आणि अमिताभ बच्चन हे त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. परंतु जेव्हा अमिताभ त्या ठिकाणाहून निघून गेले तेव्हा राजीव गांधी यांनी 'ही इज अ स्नेक' असं म्हटलं. एक पत्रकार म्हणून भारतीय हे त्या ठिकाणी होते आणि काँग्रेसचे नेते राजीव शुक्लाही त्या ठिकाणी उपस्थित होते असा दावा यातून करण्यात आला आहे. 

राहुल गांधींची फी
या पुस्तकात राजीव गांधी यांच्या निधनानंतर गांधी आणि बच्चन कुटुंबीयांमधील दुरावा अधिक वाढल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. लंडनमध्ये शिक्षण घेत असलेल्या राहुल गांधींबाबत सोनिया गांधी या चिंताग्रस्त होत्या. सोनिया गांधी यांनी आपल्या चिंतेचं कारणही अमिताभ यांना सांगितलं. परंतु राहुल गांधी यांची फी भरण्यासाठी अमिताभ बच्चन यांना टाळाटाळ केली. त्यांनी राजीव गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे ललित सुरी आणि सतीश शर्मा यांच्या पैशांच्या गडबडीचे आरोपही केल्याचा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे. 

अनेक राजकीय घटनांचा उल्लेख 
भारतीय यांच्या या पुस्तकात १९८७ सालच्या त्या महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख आहे, जेव्हा तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी विश्वनाथ प्रताप सिंह यांना अर्थमंत्री या पदावरून हटवलं होतं आणि संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली होती. या निर्णयाच्या मागेही अमिताभ बच्चनच होते असा दावा त्यांनी पुस्तकात केला आहे. राजीव गांधी यांनी असं करण्यामागे पाकिस्तानसोबत युद्धाचं कारण सांगितलं होतं. परंतु भारतीय यांच्यानुसार त्यावेळी युद्धजन्य परिस्थितीही नव्हती, असं पुस्तकात म्हटलं आहे. 

याबाबत अंदमानमध्ये ठरवण्यात आलं होतं जेव्हा राजीव गांधी त्या ठिकाणी सुट्टीसाठी गेले होते. आणि त्याच दरम्यान अमिताभ बच्चन हेदेखील म्यानमारवरून त्या ठिकाणी पोहोचले होते, असं पुस्तकात म्हटलं आहे. दरम्यान, राजीव गांधींना हे समजत नव्हतं की व्ही.पी. सिंह यांची शेली का बदलावी, जेव्हा त्यांनीच त्यांना निडरपणे पुढे जाण्यास सांगितलं होतं. अनेक उद्योजकही राजीव गांधी यांच्याकडे व्ही.पी.सिंह यांच्याकडून अर्थमंत्रालयाची धुरा पुन्हा घेण्यासाठी निवेदन पाठवत होते. अरूण नेहरूदेखील त्यांना हा सल्ला सातत्यानं देत होते. सरकारच्या निर्णयांमध्ये अरुण नेहरूंचीही भूमिका असल्याचं पुस्तकात भारतीय यांनी नमूद केलं आहे.

अमिताभ बच्चन हे राजीव गांधी यांचे मित्र होते म्हणूनच जे उद्योजक राजीव गांधी यांच्याशी संपर्क साधू शकत नव्हते त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी संपर्क साधला. असं असलं तरी राजीव गांधी यांनी कोणत्याही उद्योजकासाठी व्ही.पी. सिंग यांच्याकडे शिफारस केली नाही, असा दावाही पुस्तकातून करण्यात आला आहे. 

Web Title: former pm ranjiv gandhi once called actor abhitabh bachchan snake book reveal story politics relations between families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.