नवी दिल्ली- माजी पंतप्रधान आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल केलं आहे. रुटीन चेकअपसाठी वाजपेयींना एम्समध्ये दाखल केल्याचं भाजपानं परिपत्रकाद्वारे जाहीर केलं असलं तरी अमित शाह आणि जेपी नड्डा, नरेंद्र मोदी सोडल्यास भाजपाचे नेते वाजपेयींना पाहण्यासाठी फिरकले नव्हते.विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वाजपेयींची भाजपा नेत्यांच्या आधी जाऊन एम्समध्ये विचारपूस केली. राहुल गांधींच्या नंतर अमित शाह आणि मोदी एम्समध्ये पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु राहुल गांधींनाही अटल बिहारी वाजपेयींना भेटण्यास दिलं नाही. एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली अटल बिहारी वाजपेयी यांची तपासणी करण्यात आली आहे.93 वर्षीय अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे माजी पंतप्रधान आहेत. सध्या ते राजकाणापासून अलिप्त असून त्यांनी भारतीय जनसंघाचे नेते म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. तसेच 1957 मध्ये संसदेवर बलारामपूरमधून निवडून आले होते. त्यानंतर राजकीय आणि सरकारमधील अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत.
माजी पंतप्रधान वाजपेयी रुग्णालयात दाखल, राहुल गांधींनंतर मोदी, शहा, नड्डाही पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 7:51 PM