शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन

By admin | Published: July 27, 2015 8:42 PM

भारताचे मिसाईल मॅन व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले.

ऑनलाइन लोकमत

शिलाँग, दि. २७ - भारताचे मिसाइल मॅन व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.  नेहमी विद्यार्थ्यांमध्ये रमणारे अब्दुल कलाम यांनी शेवटच्या क्षणीही विद्यार्थ्यांसोबतच होते. कलाम यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे.  

शिलाँग येथील आयआयएममध्ये सोमवारी एपीजे अब्दुल कलाम यांचे भाषण होते. कलाम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्या आणि मंचावरच कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने शिलाँगमधील बेथनी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वरम येथील एका खेड्यात झाला होता. एका नावाड्याच्या घरात जन्मलेले कलाम यांनी अविरत मेहनत घेत विज्ञान क्षेत्रात भारताचा झेंडा रोवला. भारताच्या मिसाइल कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे कलाम हे देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले. राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यावर साधेपणामुळे ते ओळखले जात होते. सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून ते ओळखले जायचे.  कलाम यांचा प्रवास हा तरुण पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांसह भारत रत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. 

कलाम यांचे पार्थिव शिलाँगवरुन दिल्लीत आणले जाणार असून रामेश्वरम या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांनी कलाम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.