शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

यूपीच्या मंदिरातील महंत बरळले; म्हणे, अब्दुल कलाम जिहादी, त्यांनी पाकिस्तानला अणुबॉम्बची माहिती दिली!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 11:04 AM

Former President Abdul Kalam Was Jihadi Priest Of Ghaziabad Temple : नरसिंहानंद सरस्वती यांनी अलीगडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना कलाम जिहादी होते, त्यांनी अणुबॉम्बची माहिती पाकिस्तानला दिली असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - दिल्ली-एनसीआरमधील मुख्य शहरांपैकी असणाऱ्या गाझियाबादमधील डासना देवी मंदिराचे पुजारी बरळले आहेत. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. नरसिंहानंद सरस्वती यांनी अलीगडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना कलाम जिहादी होते, त्यांनी अणुबॉम्बची माहिती पाकिस्तानला दिली असं म्हटलं आहे. तसेच देशभरामध्ये सन्माननीय कुटुंबांमधील कोणतेही मुस्लीम हे कधीच भारत समर्थक असू शकत नाहीत असं देखील मत व्यक्त केलं. त्यांच्या या धक्कादायक विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

नरसिंहानंद यांनी अब्दुल कलाम यांनी डीआरडीओ प्रमुख असतानाच पाकिस्तानला अणुबॉम्ब निर्मितीसंदर्भातील माहिती दिल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तसेच कलाम यांनी मुस्लिमांसाठी एक विशेष विभाग देखील तयार केल्याचाही दावा केला आहे. राष्ट्रपती भवनामध्ये अब्दुल कलाम यांनी एक विशेष विभाग तयार केला होता जिथे कोणतीही मुस्लीम व्यक्ती आपली तक्रार दाखल करू शकत होता असं नरसिंहानंद यांनी म्हटलं आहे. गाझियाबादमध्ये काही दिवसांपूर्वी मंदिरामध्ये पाणी प्यायल्याने एका मुस्लीम तरुणाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्याच मंदिरात नरसिंहानंद हे पुजारी आहेत. 

संतापजनक! मंदिरात पाणी पिण्यासाठी आला म्हणून मुस्लीम मुलाला बेदम मारहाण, Video व्हायरल

मुस्लीम तरुणाला करण्यात आलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर शिरांगी नंद यादव नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल नेटवर्किंगवर या मुस्लीम तरुणाला पाणी पिण्यावरुन मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा वाद शांत होत असतानाच आता पुजाऱ्यांनी अब्दुल कलमांसंदर्भात केलेल्या विधानामुळे मंदीर पुन्हा वादात सापडलं आहे.  एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील सर्वोच्च पद भूषवणाऱ्या डॉ. ए.पी.जे. कलाम यांच्याबद्दल आजही भारतीयांच्या मनात आदर आणि प्रेम कायम आहे. त्यांच्या अनेक गोष्टी प्रेरणा देतात. 

कलाम यांना देशाचे मिसाइल मॅन म्हणून ओळखलं जायचं. कलाम हे आज आपल्यात नसले तरी ते त्यांच्या पुस्तकांमधून आणि भाषणांच्या व्हिडीओंमधून अनेकांना आजही प्रेरणा देतात. देशाचे 11 वे राष्ट्रपती ठरलेल्या कलाम यांना 27 जुलै 2015 मध्ये शिलाँग येथे भाषण देतानाच हृदयविकाराचा झटका आला. कलाम हे त्यांच्या साधेपणासाठी आणि प्रेरणादायी भाषणांसाठी आजही ओळखले जातात. मात्र आता पुजाऱ्यांनी केलेल्या कलामांबाबतच्या धक्कादायक विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. Former President Abdul Kalam Was Jihadi Priest Of Ghaziabad Temple 

टॅग्स :APJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलामUttar Pradeshउत्तर प्रदेशMuslimमुस्लीमPakistanपाकिस्तानIndiaभारत