नवी दिल्लीः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डिनरचं आयोजन केलं आहे. परंतु राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अन् विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद त्यात सहभागी होणार नाहीत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या डिनरमध्ये सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु त्यांनी आता या डिनरमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा आणि UPAच्या प्रमुख सोनिया गांधींना या डिनरचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अन् विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद नाराज आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधीर रंजन यांनीसुद्धा यावर आक्षेप नोंदवला आहे. विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रण देण्याची एक परंपरा आहे, परंतु त्यापासून फारकत घेतली जात आहे.
Donald Trump's Visit : ट्रम्प यांच्या आयोजित डिनरला जाणार नाही मनमोहन सिंग अन् गुलाम नबी आझाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 9:24 PM
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या डिनरमध्ये सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु त्यांनी आता या डिनरमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.
ठळक मुद्देकोविंद यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अन् विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद त्यात सहभागी होणार नाहीत.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या डिनरमध्ये सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. काँग्रेसच्या अध्यक्षा आणि UPAच्या प्रमुख सोनिया गांधींना या डिनरचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही.