नवी दिल्ली - भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि काँग्रेसच्या सर्व मंडळींनी मनमोहन सिंग यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देशाला त्यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवत असल्याचं देखील म्हटलं आहे.
"भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवत आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, सभ्यता आणि समर्पण आम्हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा" असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. एक अर्थशास्त्रज्ञ, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, देशाचे वित्तमंत्री आणि पंतप्रधान म्हणून डॉ. सिंग यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे.
तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...
अर्थशास्त्रत्र म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांनी नंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर 1991 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहा राव यांनी त्यांना राजकारणात आणत वित्तमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर त्यांनी मांडलेल्या ऐतिहासिक अर्थसंकल्पामुळे देशाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत झाली होती. 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचा अनपेक्षितरीत्या पराभव झाला होता. त्यानंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे अनपेक्षितरीत्या पंतप्रधानपदाची माळ डॉ. मनमोहन सिंग यांच्या गळ्यात पडली.
मनमोहन सिंग यांनी घेतलेले अनेक निर्णय हे त्यांच्या कणखरतेची साक्ष देणारे
उच्चशिक्षित असलेल्या मनमोहन सिंग यांच्याबाबत आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यांना हिंदी वाचता येत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा हिंदीतून भाषण करण्याची गरज भासल्यावर ते उर्दूमधून लिहून घेत असत. तसेच भाषण देण्यापूर्वी त्याचा सराव करत असत. मनमोहन सिंग हे कमकुवत पंतप्रधान असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून नेहमीच करण्यात आला. मात्र त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे त्यांच्या कणखरतेची साक्ष देणारे ठरले. 2008 मध्ये झालेल्या भारत-अमेरिका अणुकरारासाठी त्यांनी आपले सरकार पणाला लावले होते. तसेच त्यांच्या दुरदृष्टीमुळेच भारत विकसनशील देशांमधून विकसित देशांच्या दिशेने वाटचाल करू लागला.
महत्त्वाच्या बातम्या
"भारतीय हवाई दलात पाकिस्तान आणि चीनला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद"
CoronaVirus News : गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ, कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी!
भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले; जोरदार 'राडा' अन् तुफान हाणामारी, Video व्हायरल
Bharat Bandh : "ना मोबदला, ना सन्मान; नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार"