शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Amrinder Singh Resigns : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा, नव्या पक्षाचीही घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 5:21 PM

Amrinder Singh Resigns : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला राजीनामा. नव्या पक्षाचीही केली घोषणा.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री (Former CM Punjab) कॅप्टन अमरिंदर सिंग (Amrinder Singh) यांनी अखेर काँग्रेस पक्षाचा हात सोडला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून यासंदर्भातील पत्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे पाठवलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण काँग्रेसचाही राजीनामा देणार असल्याचं त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं.मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचाही राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या नव्या पक्षाचीही घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नव्या पक्षाला पंजाब लोक काँग्रेस असं नाव दिलं आहे. आपण पंजाबमधील सर्व ११७ जागा लढवू असंही त्यांनी सांगितलं होतं. याशिवाय भाजपसोबत युती केली जाईल का नाही यावरही त्यांनी भाष्य केलं होतं. "मी भाजपसोबत युती करण्याबाबत कधीही वक्तव्य केलं नव्हतं. आम्ही सीट शेअर करू शकतो. याबाबत भाजपशी चर्चा झाली नसली तरी यावर विचार करत आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.काँग्रेसवरही साधला होता निशाणाअमरिंदर सिंग यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंतर पक्षामध्ये माझा अपमान होत असल्याचं सांगितलं होतं. अमरिंदर यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबमधील राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या. "काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये १५ जागा मिळणंही मुश्कील "असल्याचं म्हणत त्यांनी सणसणीत टोला लगावला होता. परनीत कौर यांनी "अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ११७ पैकी १५ जागाही पक्षाला जिंकता येणार नाहीत," असंही म्हटलं होतं. 

टॅग्स :PunjabपंजाबChief Ministerमुख्यमंत्रीSonia Gandhiसोनिया गांधी