काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 06:11 AM2019-07-28T06:11:36+5:302019-07-28T06:23:48+5:30
यूपीए सरकारच्या काळात जयपाल रेड्डी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार सांभाळला होता.
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते.
जयपाल रेड्डी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Telangana: Former Union Minister and Congress leader, Jaipal Reddy, passes away in Hyderabad. (File pic) pic.twitter.com/kqbCJAH7jH
— ANI (@ANI) July 27, 2019
जयपाल रेड्डी यांचा जन्म 16 जानेवारी 1942 मध्ये हैदराबादमधील मदगुलमध्ये झाला होता. सध्या हे तेलंगना राज्यात येते. जयपाल रेड्डी यांच्यामागे एक मुलगी आणि दोन मुले आहेत. यूपीए सरकारच्या काळात जयपाल रेड्डी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार सांभाळला होता. आंध्रप्रदेशात जयपाल रेड्डी चारवेळा आमदार आणि 5 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.