माजी केंद्रीय मंत्री हंसराज भारद्वाज यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 07:15 AM2020-03-09T07:15:08+5:302020-03-09T07:24:21+5:30
वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हंसराज भारद्वाज हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नवी दिल्लीः कर्नाटकचे माजी राज्यपाल आणि माजी कायदा मंत्री हंसराज भारद्वाज यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हंसराज भारद्वाज हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कार्डिएक अरेस्टमुळे हंसराज भारद्वाज यांचं निधन झालं असून, आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्यावर दिल्लीतल्या निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हंसराज भारद्वाज यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केलं. पीएमओनं ट्विट करत सहवेदना व्यक्त केल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री हंसराज भारद्वाज यांच्या निधनामुळे मी दुःखी आहे. दुःखाच्या या क्षणात मी त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत आहे.
Anguished by the passing away of former Minister Shri Hans Raj Bhardwaj. My thoughts are with his family and well-wishers in this hour of grief. Om Shanti: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 8, 2020
तसेच लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. 19 मे 1937ला हरियाणात जन्मलेल्या हंसराज भारद्वाज यूपीएच्या कार्यकाळात अनेक वर्षं कायदा मंत्री होते. हंसराज भारद्वाज यांनी 22 मे 2004 ते 28 मे 2009पर्यंत कायदामंत्रिपद सांभाळलं होतं. तसेच भारद्वाज यांनी स्वातंत्र्यानंतर जास्त काळ कायदामंत्रिपद भूषवलेलं आहे.
हंसराज यांनी कायदामंत्रिपदानंतर राज्यपाल म्हणून सेवा दिली आहे. भारद्वाज यांनी कर्नाटक आणि केरळचं राज्यपालपद भूषवलेलं आहे. भारद्वाज 2009 ते 2014पर्यंत कर्नाटकचे राज्यपाल होते. तसेच 2012-13पर्यंत ते केरळचेही राज्यपाल होते. त्याशिवाय हंसराज भारद्वाज 1982, 1994, 2000 आणि 2006 राज्यसभेचे सदस्यसुद्धा राहिले आहेत. तसेच काँग्रेस नेते हंसराज भारद्वाज हे सर्वोच्च न्यायालयातील नावाजलेले वकीलसुद्धा होते.कर्नाटक और केरल के पूर्व राज्यपाल और पूर्व केन्द्रीय कानून मंत्री श्री हंसराज भारद्वाज जी के निधन का समाचार मिला। भारद्वाज जी का निधन राजनैतिक
— Lok Sabha Speaker (@loksabhaspeaker) March 8, 2020
जगत के लिए एक अपूरणीय क्षति है। ईश्वर हंसराज जी को अपने श्री चरणों में स्थान दे।
विनम्र श्रद्धांजलि