नवी दिल्लीः कर्नाटकचे माजी राज्यपाल आणि माजी कायदा मंत्री हंसराज भारद्वाज यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हंसराज भारद्वाज हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कार्डिएक अरेस्टमुळे हंसराज भारद्वाज यांचं निधन झालं असून, आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्यावर दिल्लीतल्या निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.हंसराज भारद्वाज यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केलं. पीएमओनं ट्विट करत सहवेदना व्यक्त केल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री हंसराज भारद्वाज यांच्या निधनामुळे मी दुःखी आहे. दुःखाच्या या क्षणात मी त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत आहे.
माजी केंद्रीय मंत्री हंसराज भारद्वाज यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 7:15 AM
वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हंसराज भारद्वाज हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ठळक मुद्देकर्नाटकचे माजी राज्यपाल आणि माजी कायदा मंत्री हंसराज भारद्वाज यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हंसराज भारद्वाज हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कार्डिएक अरेस्टमुळे हंसराज भारद्वाज यांचं निधन झालं असून, आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्यावर दिल्लीतल्या निगम बोध घाटावर विधी केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.