शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

लोकसभेतल्या खासदारांची संख्या 1000 करा, प्रणव मुखर्जींचा मोदी सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 8:46 AM

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी लोकसभेची सदस्य संख्या जवळपास दुप्पट करण्याचा सल्ला दिला आहे.

नवी दिल्लीः देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी लोकसभेची सदस्य संख्या जवळपास दुप्पट करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी इंडिया फाऊंडेशनद्वारे आयोजित अटल बिहारी वाजपेयी स्मृती व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभेची सदस्य संख्या 543हून वाढवून एक हजार करायला पाहिजे. तसेच राज्यसभेची सदस्य संख्यासुद्धा वाढवण्याची गरज आहे. देशाची लोकसंख्या आणि वाढत्या आकारामुळे सदस्य संख्या वाढवणं आवश्यक असल्याचंही प्रतिपादन प्रणव मुखर्जींनी केलं आहे. 1977ला लोकसभेची सदस्य संख्या शेवटची बदलण्यात आली होती. 1971च्या जनगणनेच्या आधारावर ती सदस्य संख्या ठरवण्यात आली होती. त्यावेळी देशाची लोकसंख्या 55 कोटी होती. तेव्हापासून आतापर्यंत देशाची लोकसंख्या दुपटीनं वाढली आहे. त्यामुळेच लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा पुन्हा विचार करायला हवा. बहुमताचा दुरुपयोग केल्यास जनता देते शिक्षा- प्रणव मुखर्जीमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बहुमताच्या दुरुपयोगावरून इशारा दिला आहे. आपल्याला वाटतं सदनात पूर्ण बहुमत मिळालं आहे, म्हणजे आपण काहीही करू शकतो. परंतु असं करणं योग्य नाही. अशा लोकांना जनतेनंच वेळोवेळी धडा शिकवला आहे. संसदीय लोकशाहीत बहुमत स्थिर सरकार बनवण्यासाठी मिळतं. पूर्ण बहुमत नसल्यास सरकार तयार करता येत नाही. हाच संसदीय लोकशाहीचा संदेश आणि त्याचा आत्मा आहे. 1952पासून आतापर्यंत जनतेनं राजकीय पक्षांना संख्यात्मक  बहुमत दिलेलं आहे. पण मतदारांनी कोणत्याही एकाच पक्षाला बहुमत दिलेलं नाही. राजकीय पक्षांनी हा संदेश समजून घेतला पाहिजे. एक देश, एक निवडणूक ठीक नाहीएक देश, एक निवडणुकीच्या प्रस्तावावर प्रणव मुखर्जी यांनी नाराजी व्यक्त केली. संविधानात सुधारणा करून असं केलं तरी भविष्यात जनतेचे प्रतिनिधी सरकारवर अविश्वास दाखवणार नाहीत कशावरून, याची खात्री कुणीही देऊ शकत नाही.  

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जी