नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सरकारने एक सर्वसमावेशक धोरण तयार करावे आणि लॉकडाऊनच्या काळात प्रभावित होणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी एक किमान समान कार्यक्रम तयार करावा, अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.
काँग्रेस कार्य समितीची (सीडब्ल्यूसी) व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली. यात असा आरोपही करण्यात आला की, सरकारने कोणत्याही तयारीशिवाय लॉकडाऊन केले. यामुळे कोट्यवधी लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सोनिया गांधी म्हणाल्या की, आमच्यासमोर हे मोठे आव्हान आहे. मात्र, यातून मार्ग काढण्याचा आमचा संकल्प अधिक मोठा असायला हवा. आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य मिळायला हवे. त्यांना एन ९५ मास्क आणि हजमत सूट यासारख्या सुरक्षा मिळायलाहव्यात.
सोनिया गांधी म्हणाल्या की, लॉकडाऊन योजनाबद्ध पद्धतीने लागू करण्यात आले नाही. यामुळे देशात लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लाखो कामगारांना याचा त्रास झाला. हे लोक शेकडो किमी पायी चालताना दिसले. त्यांच्या वेदना कमी करणे ही आमची जबाबदारी आहे. मी सरकारला आवाहन करते की, त्यांनी कोरोनाशी संबंधित हॉस्पिटल, बेडची संख्या, लोकांना वेगळे ठेवण्याची सुविधा आदींची माहिती द्यावी. शेतकºयांना तात्काळ कर्ज मिळायला हवे.
नवे आर्थिक पॅकेज जाहीर करा
च्काँग्रेसच्या सीडब्ल्यूसीने अशी मागणी केली आहे की, समस्यांचा सामना करणाºया कामगार, शेतकरी आणि गरिबांसाठी नवे आर्थिक पॅकेज जाहीर करावे. च्या बैठकीनंतर एका निवेदनात म्हटले आहे की, देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारने अर्थतज्ज्ञांची मदत घेऊन आर्थिक कार्यदल स्थापन करावे.