कोरोना विषाणूविरोधातील लढाईत (Coronavirus) रशियाच्या स्पुटनिक व्ही (Sputnik V) या लसीचं ट्रायल रुन सुरू करण्यात आलं आहे. गुरुग्रामच्या फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सामान्य जनतेसाठी कोरोना लसीचं ट्रायल रन सुरू करण्यात आलं. तर दिल्ली एनसीआरच्या निरनिराळ्या भागांमध्ये लसी पोहोचण्यास वेळ लागत आहे. स्पुटनिक व्ही लसीचं भारतात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीतर्फे उत्पादन आणि वितरण करण्यात येणार आहे.
देशात २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ७५ लसी केंद्र सरकारला तर २५ टक्के लसी या खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे. तसंच देशात खासगी रुग्णालयांसाठी केंद्र सरकारनं लसींचे दरही निश्चित केले आहे. केंद्र सरकारनं स्पुटनिक व्हीच्या एका डोसची किंमत १,१४५ रूपये निश्चित केली आहे.