रुग्णसेवेसाठी दिली 40 लाखांची फॉर्च्यूनर, आमदारानं दाखवलं मोठं मन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 08:25 AM2021-05-19T08:25:15+5:302021-05-19T08:26:49+5:30
गुना जिल्ह्यातील चांचौडा विधानसभा क्षेत्रात एम्बुलन्सची सुविधा अतिशय दयनीय आहे. त्यामुळे येथील काँग्रेस नेत आणि आमदार लक्ष्मणसिंह यांनी आपली कारच रुग्णांच्या सेवेसाठी दिली.
जयपूर - देशावरील कोरोना महामारीच्या संकटात प्रत्येकजण आपलं योगदान देत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मदतीसाठी खारीचा आणि सिंहाचा वाटा उचलण्यात येत आहे. रुग्णांना बेड मिळविण्यासाठी धडपड करण्यापासून ते गरिबांच्या घरातील चूल पेटली पाहिजे, हाही विचार समाज कार्यातून दिसून येत आहे. कुठे औषधांचा काळाबाजार होत असताना या संकटात माणूसकीचं दर्शनही पावलोपावली घडत आहे. जयपूरमधील एका आमदाराने आपली 40 लाख रुपयांची फॉर्च्यूनर गाडी एम्बुलन्स बनवून गरजूंसाठी दिलीय.
गुना जिल्ह्यातील चांचौडा विधानसभा क्षेत्रात एम्बुलन्सची सुविधा अतिशय दयनीय आहे. त्यामुळे येथील काँग्रेस नेत आणि आमदार लक्ष्मणसिंह यांनी आपली कारच रुग्णांच्या सेवेसाठी दिली. मंगळवारी आमदार महोदयांना आपली 40 लाख रुपये किंमतीची कार रुग्णावाहिका म्हणून दिली. काही दिवसांपूर्वीच आमदार सिंह यांनी एक व्हिडिओ जारी केला होता. त्यामध्ये, गाव-खेड्यातील रुग्णांसाठी लवकर एम्बुलन्स उपलब्ध होत नसून रुग्णांची गैरसोय होत असल्याचं ते म्हणाले होते. तसेच, आरोग्य विभागाने परवानगी दिल्यास, मी माझी खासगी कार रुग्णांच्या सेवेसाठी देईल, असेही त्यांनी म्हटले होते.
Congress MLA from Chanchauda constituency, Sh Laxman Singh has donated his Toyota Fortuner to Binaganj health center which will be used as an Ambulance. pic.twitter.com/c0hztIDASh
— Aditya Goswami (@AdityaGoswami_) May 18, 2021
मंगळवारी रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपली गाडी आरोग्य विभागाकडे दिली. तेव्हापासून रुग्णावाहिका म्हणून या गाडीचा उपयोगही सुरू झाला आहे. त्यानंतरही, आमदार लक्ष्मण सिंह यांनी व्हिडिओ शेअर करत, माझी फॉर्च्यूनर कार रुग्णांसाठी दिल्याचं म्हटलंय. तसेच, मतदारसंघातील नागरिकांनी सेवा करण्याची संधी दिली, माझेही कर्तव्य बनतेय की मी शक्य ती मदत करेन, असेही त्यांनी या व्हिडिओत म्हटलंय.