Fortuner and Kodiaq Accident: भारतात रस्ते अपघाताच्या घटना सर्रास घडतात. त्यामुळे तुम्ही ज्या वाहनातून प्रवास करत आहात, ते जर सुरक्षित नसेल तर तुमच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. अलीकडेच सुरक्षित समजल्या जाणाऱ्या टोयोटा फॉर्च्युनर(Fortuner) आणि स्कोडा कोडियाक(Skoda Kodiaq) या दोन लोकप्रिय वाहनांचा भीषण अपघात झाला. ही घटना तामिळनाडूच्या थोपूर भागात एका महामार्गावर घडली. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, महामार्गावर अचानक फॉर्च्युनर आली, त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या स्कोडा कोडियाक एसयूव्हीची धडक झाली.
ही टक्कर इतकी भीषण होती की स्कोडा कोडियाकने अचानक पेट घेतला. या दोन्ही एसयूव्ही खूप सुरक्षित असल्यामुळे एसयूव्हीमधील प्रवासी सुरक्षितपणे बाहेर पडले. हाच अपघात एखाद्या कमकुवत SUV सोबत घडला असता, तर त्याचे परिणाम अतिशय भयंकर झाले असते. पण, या अपघातात वाहनामधील लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.
विशेष म्हणजे, या धडकेत फॉर्च्युनरपेक्षा कोडियाकचे जास्त नुकसान झाले. यामध्ये एअरबॅग्जही उघड्या दिसतात. तसेच, स्कोडा एसयूव्हीला लागलेली आग इतकी भीषण होती की आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. अपघातातील फॉर्च्युनर ही फर्स्ट जनरेशन होती, ज्यामध्ये 2 एअरबॅग आणि ABS आहे. यात 2 टर्बो डिझेल इंजिन मिळतात. एक 2.5L-4 सिलेंडर युनिट 143 Bhp-320 Nm जनरेट करते आणि 3L-4 सिलेंडर युनिट 171 Bhp-343 Nm जनरेट करते.
स्कोडा कोडियाकदेखील एक शक्तिशाली एसयूव्ही आहे, ज्याची किंमत सध्या सुमारे 40 लाख रुपये आहे. ही फर्स्ट जनरेशन मॉडेल आहे, ज्यामध्ये 2 लीटर टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. कोडियाकला तब्बल 9 एअरबॅग्ज आणि ABS + EBD, TCS आणि ड्रायव्हर अलर्ट सिस्टम यांसारखी सुरक्षा फीचर्स आहेत.