शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

चार ‘अ‍ॅपाचे’ हेलिकॉप्टर वेळेआधीच भारतात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 1:15 AM

कंपनीने ठरल्यावेळेआधीच हेलिकॉप्टर पुरविले आहेत.

नवी दिल्ली : हवाई दलासाठी अमेरिकेच्या बोर्इंग कंपनीकडून खरेदी करण्यात येणाऱ्या एकूण २२ पैकी पहिले चार ‘अ‍ॅपाचे’ लढाऊ हेलिकॉप्टर शनिवारी भारतात दाखल झाले. कंपनीने ठरल्यावेळेआधीच हेलिकॉप्टर पुरविले आहेत.बोर्इंग कंपनीने ही माहिती देताना सांगितले की, ‘एएच ६४-ई’ या मॉडेलची ही चार हेलिकॉप्टर्स दिल्लीजवळच्या हिंदन हवाईतळावर पोहोचली. पुढील आठवड्यात आणखी चार हेलिकॉप्टर्सची आणखी एक खेप येईल. नंतर आठही हेलिकॉप्टर्स पठाणकोट हवाईतळावर नेऊन तेथे भारतीय हवाईदलाकडे औपचारिकपणे सुपूर्द केली जातील.अनेक प्रकारच्या लढाऊ क्षमता असलेले ‘अ‍ॅपाचे’ हे जगात सध्या वापरले जाणारे सर्वात प्रगत हेलिकॉप्टर मानले जाते. अमेरिकेच्या हवाईदलातही प्रामुख्याने हच्ो हेलिकॉप्टर वापरले जातात. हवाईदलासाठी अशी एकूण २२ हेलिकॉप्टर्स घेण्याचा करार बोर्इंग कंपनी व अमेरिका सरकारशी सप्टेंबर २०१५ मध्ये करण्यात आला होता. भारतीय हवाईदलात यामुळे आक्रमक लढाऊ हेलिकॉप्टरचा पहिलाच ताफा उपलब्ध होईल. हा संपूर्ण ताफा पुढील वर्षापर्यंत कार्यरत होईल.गेल्या जुलैमध्ये हवाईदलाने या हेलिकॉप्टरच्या यशस्वी चाचण्या घेतल्या होत्या. त्यानंतर हवाईदलातील वैमानिकांची तुकडी प्रशिक्षणासाठी अमेरिकेलाही पाठविण्यात आली. भारताला देण्यात येत असलेले हेलिकॉप्टर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण व म्हणूनच जगातील सर्वोत्तम आहेत, असेही बोर्इंग कंपनीने म्हटले.मोठी बळकटी मिळेलहवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या हेलिकॉप्टरमुळे हवाई दलाच्या मारकक्षमतेला बळकटी मिळेल. भविष्यातील गरजा व आव्हाने लक्षात घेऊन हवाई दलाच्या आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणूनच ती खरेदी करण्यात येत आहेत.याखेरीज ४,११८ कोटी रुपये खर्च करून अशीच सहा हेलिकॉप्टर्स भारतीय लष्करासाठी खरेदी करण्यास संरक्षण मंत्रालयाने याआधीच मंजुरी दिली आहे.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल