श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अरिहलमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या आणि तो घडवून आणण्यात सहभागी असलेल्या जैश-ए-मोहम्मदशी संबंधित चार जणांना अटक करण्यात आली आहे.पुलवामाच्या अरिहालमध्ये जुलैमध्ये झालेल्या एका स्फोटप्रकरणी तपासादरम्यान पोलिसांना शारीफ अहमद नावाच्या एका व्यक्तीबाबत संशय होता. तो एका विदेशी दहशतवाद्याशी सातत्याने संपर्कात होता. अहमदने जैशशी संबंधित तीन अन्य व्यक्ती आकिब अहमद, आदिल अहमद मीर आणि ओवैस अहमद यांच्यासोबत कट रचला. हा स्फोट घडवून आणला.अड्ड्याचा पर्दाफाशसुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात मंगळवारी एक स्फोटक सेट आणि एक वायरलेस सेट जप्त केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरनकोटच्या जंगलात संशयित लोकांच्या हालचाली होत असल्याची माहिती ग्रामीण भागातील लोकांनी दिली.त्यानंतर या भागात सर्च आॅपरेशन करण्यात आले. यात सात आयईडी, गॅस सिलिंडर आणि एक वायरलेस सेट या जंगलातून जप्त करण्यात आला. आतापर्यंत कोणत्याही संशयिताला पकडण्यात आलेले नाही.
Pulwama Attack : ‘जैश-ए-मोहम्मद’शी संबंधित चार जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 2:21 AM