ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी मोहम्मद अख्तरवर कारवाई केल्यानंतर क्राईम ब्रांचनं याप्रकरणात आता चौथ्या व्यक्तीला अटक केली आहे. फाहत असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो समाजवादी पक्षातील मुनावर सलीम यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे.
याआधी शुक्रवारी राजस्थानमधून पाकिस्तानी हेर शोएबला अटक करण्यात आली होती. तसंच पाकिस्तानी अधिकारी मोहम्मद अख्तरला मदत करणा-या मौलाना रमजान आणि सुभाष जांगिड या दोघांना गुरुवारी दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले होते. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे.
आणखी बातम्या
Espionage racket: One more person, Fahat, a close aide of SP leader Munawwar Saleem detained by Delhi Crime Branch.— ANI (@ANI_news) October 29, 2016
या दोघांना पटियाला हाऊस कोर्टाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांवर अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानी अधिकारी मोहम्मद अख्तरपर्यंत पोहोचवण्याचा आरोप आहे. क्राईम ब्रांचने पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी मोहम्मद अख्तरला हेरगिरीच्या आरोपावरुन ताब्यात घेतले होते.
या कारवाईनंतर काही वेळाने त्याची सुटका करण्यात आली असून त्याला तातडीने भारत सोडण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. या पाकिस्तानी अधिका-याकडे भारतीय लष्करासंबंधी अतिशय संवेदनशील आणि गोपनीय माहिती असलेली कागदपत्रं आढळून आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच हा अधिकारी पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होता, अशी माहितीदेखील समोर आली आहे.