शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

Karnataka Election: पक्ष कुठलाही असू द्या.. बेळगावचे 'सावकर' जारकीहोळीच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 7:09 PM

एकाचवेळी एकाच कुटुंबातील चौघे आमदार असण्याचे उत्तर कर्नाटकातील हे एकमेव उदाहरण

राम मगदूम बेळगाव : पक्ष कुठलाही असू द्या, परंतु, 'सावकर' हमखास निवडून येणारच अशीच ख्याती बेळगाव जिल्ह्यातील जारकीहोळी बंधूंची आहे. तिघे सख्खे भाऊ यावेळीही रिंगणात आहेत. त्यापैकी दोघे भाजपतर्फे, तर एकटा 'काँग्रेस'कडून लढत आहे. धाकटा सध्या कर्नाटकच्या विधानपरिषदेवर आहे. एकाचवेळी एकाच कुटुंबातील चौघे आमदार असण्याचे उत्तर कर्नाटकातील हे एकमेव उदाहरण आहे. यावेळीही सगळे निवडून येणारच, अशीच चर्चा बेळगावसह सीमाभागात आहे.माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे सर्वांत ज्येष्ठ. १९९९ मध्ये ते काँग्रेसकडून पहिल्यांदा निवडून आले. तेव्हापासून ते सलग ५ वेळा निवडून आले आहेत. यावेळी ते गोकाकमधून सहाव्यांदा रिंगणात आहेत. दरम्यान, २०१९ मध्ये भाजपच्या ‘ऑपरेशन कमळ’मध्ये राज्यातील १५ आमदारांच्या बंडाचे नेतृत्व त्यांनीच केले होते. परिणामी, 'काँग्रेस'च्या सिद्धरामय्यांचे सरकार जाऊन भाजपच्या येडियुराप्पांचे सरकार पुन्हा सत्तेत आले. त्याबदल्यात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले होते. परंतु, तथाकथित सीडी प्रकरणामुळे त्यांना मंत्रिपद गमवावे लागले.माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी हे २००४ मध्ये जनता दल-धर्मनिरपेक्षकडून पहिल्यांदा निवडून आले. तेव्हापासून ते सलग चारवेळा निवडून आले. यावेळी ते आरभावीमधून पाचव्यांदा रिंगणात आहेत. जनता-दल भाजप युतीच्या कुमारस्वामींच्या सरकारमध्ये सहकार व पणनमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. २००८ मध्ये भाजपच्या ऑपरेशन कमळमध्ये त्यांनी जदच्या आमदारकीचा राजीनामा दिला व पोटनिवडणुकीत भाजपतर्फे पुन्हा निवडून आले.माजी मंत्री व कर्नाटक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी हे २००८ मध्ये यमकनमर्डीमधून पहिल्यांदा विजयी झाले. तेव्हापासून सलग तीनवेळा ते निवडून आले. ही त्यांची चौथी निवडणूक आहे. दरम्यान, जनता दलातर्फे विधानपरिषदेवर काम करण्याची संधीही त्यांना मिळाली होती. काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारमध्ये ते अबकारी खात्याचे मंत्री होते.आमदार लखन जारकीहोळी हे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचे कनिष्ठ बंधू. २०२१ मध्ये ते विधानपरिषदेवर अपक्ष निवडून आले आहेत. परंतु, सध्या तेदेखील भाजपमध्येच सक्रिय आहेत. एकंदरीत गेल्या दोन दशकांपासून जारकीहोळी कुटुंबातील तिघांची आमदारकी विशेष चर्चेत असून, लखन यांच्या रूपाने चौथ्याची भर पडली आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकbelgaum-pcबेळगावbelgaonबेळगाव