गुजरातच्या चार काँग्रेस आमदारांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 06:02 AM2020-03-16T06:02:36+5:302020-03-16T06:02:55+5:30

संख्याबळ पाहता सत्ताधारी भाजप राज्यसभेच्या चारपैकी दोना जागा स्वबळावर सहज जिंंकू शकते. त्याहून जास्त जागांसाठी त्यांना इतरांची मदत लागेल किंवा विरोधकांची मते कमी व्हावी लागतील.

Four Congress MLAs of Gujarat resign | गुजरातच्या चार काँग्रेस आमदारांचे राजीनामे

गुजरातच्या चार काँग्रेस आमदारांचे राजीनामे

Next

अहमदाबाद: राज्यसभेच्या चार जागांसाठी होऊ घातलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या चार काँग्रेस आमदारांनी रविवारी विधानसभेचा राजीनामा दिला. संख्याबळ पाहता सत्ताधारी भाजप राज्यसभेच्या चारपैकी दोना जागा स्वबळावर सहज जिंंकू शकते. त्याहून जास्त जागांसाठी त्यांना इतरांची मदत लागेल किंवा विरोधकांची मते कमी व्हावी लागतील. हे राजीनामे त्याच रणनीताचा भाग असावा, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.
यामुळे १८२ सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसची संख्या ६९वर आली. हे राजीनामे मी मंजूर केले आहेत. त्यांची नावे मी उद्या विधानसभेत जाहीर करीन, असे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले. विधानसभेत राज्यसभेसाठी मतदान २६ मार्च रोजी व्हायचे आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Four Congress MLAs of Gujarat resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.