शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चार दलित खासदारच मोदींच्या विरोधात? चौघेही जण उत्तर प्रदेशातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:16 AM

मोदी सरकारने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबद्दल घेतलेली उदासीन भूमिका व एकूणच हिंदुत्वाबाबत भाजपाच्या अनेक नेत्यांची आक्रमक भूमिका यामुळे उत्तर प्रदेशातील भाजपाचे किमान चार खासदार संतप्त दिसत आहेत. उत्तर प्रदेश भाजपासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

लखनौ : मोदी सरकारने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबद्दल घेतलेली उदासीन भूमिका व एकूणच हिंदुत्वाबाबत भाजपाच्या अनेक नेत्यांची आक्रमक भूमिका यामुळे उत्तर प्रदेशातील भाजपाचे किमान चार खासदार संतप्त दिसत आहेत. उत्तर प्रदेश भाजपासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.सावित्रीबाई फुले (बहराईच), छोटेलाल खरवार (रॉबर्ट्सगंज) अशोक कुुमार दोहरे (इटावा) आणि यशवंत सिंग (नगिना) या चार खासदारांनी आपली नाराजी वा संताप लपवून न ठेवता जाहीरपणे व्यक्त केला आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत भाजपा संवेदनशील नसून, आरक्षण रद्द करण्याची भाषणा काही नेते करीत असल्याने हे खासदार अस्वस्थ आहेत. यांच्यापैकी एका खासदाराने तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपला अपमान करतात, अशी थेट तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर ज्याप्रकारे देशभरातील दलित समाज एकत्र आला, त्या पार्श्वभूमीवर या खासदारांनी स्वपक्षावरच टीका केली आहे. सर्वात आधी आवाज उठवला सावित्रीबाई फुले यांनी. त्यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायदा व आरक्षणाबाबत मत व्यक्त करताना, भाजपाचे अनेक नेते राज्यघटना बदलण्याची भाषा करीत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी ‘भारतीय संविधान और आरक्षण बचाव’ मेळावाही घेतला. या मेळाव्यामुळेच भाजपामध्ये सर्व ठिकठाक चालले नसल्याचे उघड झाले. त्यानंतर बंडाचा झेंडा उचलत छोटेलाल खरवार यांनी योगी आदित्यनाथ जातीच्या आधारे भेदभाव करतात, असा आरोप केला. त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगापर्यंत तक्रार पोहोचवली. उत्तर प्रदेश भाजपाच्या अनुसूचित जाती-जमाती विभागाचे अध्यक्ष असलेल्या खरवार यांच्या पत्राने वातावरण आणखी बिघडले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अधिकृत कागदोपत्री भीमराव रामजी आंबेडकर करण्याच्या आदित्यनाथ सरकारच्या निर्णयाला अशोक कुमार दोहरे यांनी आक्षेप घेतला. राज्यातील पोलीस दलितांविषयी वाईट भाषेत बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनीही तक्रार पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहोचवली. पश्चिम उत्तर प्रदेशमधील जाटव समाजाचे नेते खा. यशवंत सिंग यांनीही मोदी सरकारविषयी नाराजी व्यक्त केली आहे. मोदी व पक्षाने २0१४ साली दलितांना तसेच बेराजेगारांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याची टीका केली. तसेच देशात दलितांची संख्या ३0 कोटी असून, त्यांना दिलेले एकही आश्वासन सरकारने पूर्ण केलेले नाही, असे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)दलित समाजापासून तुटण्याची भीतीपुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होत आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या दोन पोटनिवडणुकांत सपा व बसपा यांनी एकत्र येऊ न भाजपाचा पराभव केल्याने दलित व मागासवर्गीय वेगळा विचार करू लागले आहेत, याची खात्री भाजपाच्या या चार खासदारांना पटली आहे. अशा वेळी आपण पक्षाचीच बाजू मांडत राहिलो, तर समाज आपल्यापासून तुटेल, याचा अंदाज त्यांना आला असावा, असे दिसते. त्यामुळेच हे चौघे आक्रमक झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ आणखी काही दलित खासदार व आमदार नाराजी व्यक्त करू लागतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी