शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

मॉकपोलसह मतदान घेतल्याप्रकरणी चार कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 17:09 IST

डोणगाव येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या मतदान केंद्र क्रमांक १२० वर मॉकपोलसह मतदान प्रकरणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी मतदान केंद्रावरील चार कर्मचार्यांना निलंबित केले.

बुलडाणा:  लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या  टप्प्यात बुलडाणा लोकसभेअंतर्गत डोणगाव येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या मतदान केंद्र क्रमांक १२० वर मॉकपोलसह मतदान प्रकरणात अखेर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी मतदान केंद्रावरील चार कर्मचार्यांना निलंबित केले आहे. दरम्यान, या मतदान केंद्रावर २४ एप्रिल रोजी फेरमतदान घेण्यात येत असून त्यासाठी राखीव कोट्यातील कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून राखीव ईव्हीएम मशीनचा यासाठी वापर करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.निलंबीत करण्यात आलेल्यामध्ये  केंद्राधिकारी तथा नांदुरा येथील कोठारी हायस्कूलवर असलेले सहाय्यक शिक्षक नंदकिशोर लागे, चिखली येथील तक्षशिला हायस्कूलवरील कनिष्ठ लिपीक किशोर देशमाने, खामगाव बाजार समितीमधील कनिष्ठ लिपीक जे. पी. अमालकर आणि बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी येथील जिल्हा परिषदेच्या  उर्दू हायस्कूलमधील शिक्षक अब्दुल नईम शेख अब्दुला यांचा समावेश आहे. जिल्हाधिकार्यांनी एका आदेशानुसार त्यांचे निलंबन केले असल्याचे सुत्रांनी सांगितले. निलंबन काळात  संबंधितांचे मुख्यालय कोणते राहणार ही बाब मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

डोणगाव येथील श्री शिवाजी हायस्कूलमधील १२० क्रमांकाच्या मतदान केंद्रावर घेण्यात आलेल्या मॉक पोलसह मतदारांचे मतदान १८ एप्रिल रोजी घेण्यात आले होते. ही चूक जवळपास एक तासाने निदर्शनास आल्यानंतर त्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला केला होता. मात्र निवडणूक आयोगाने ठरून दिलेल्या प्रक्रियेचे यात पालन झाले नाही. त्यामुळे कामात हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रश्नी निवडणूक निरीक्षक आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निरुपमा डांगे, रिंगणातील उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतदानाच्या दुसर्या दिवशी १९ एप्रिल रोजी स्क्रुटनी केली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला होता.

या प्रकरणी २१ एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांना अनुषंगी आदेश मिळाले होते. त्यानुसार २४ एप्रिल रोजी डोणगावच्या १२० क्रमांकाच्या या मतदान केंद्रावर फेर मतदान करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. प्रकरणी राज्याचे उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी यांचे पत्र आले होते. दरम्यान २२ एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी उपरोक्त चौघांना निलंबीत केले आहे. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

फेरमतदााची तयारी अंतिम टप्प्यातडोणगाातील या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सोमवारी दुपारी चार वाजता राखीव बॅलेट, कंट्रोल युनीट आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ करण्यात येऊन त्यातून या केंद्रासाठी यंत्रणे निवडण्यात आली आहेत. सोबतच राखीव कोट्यातील कर्मचार्यांचे एक पथक येथे फेरमतदान घेण्यासाठी पोहोचणार आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत फेरमतदान होईल.

फेरमतदानाच्या टक्केवारीबाबत उत्सूकताया केंद्रावर आता फेरमतदान होत असल्याने त्यात प्रत्यक्ष किती टक्के मतदान होते याबाबत उत्सूकता लागून आहे. या मतदान केंद्रावर ५९६ मतदान असून त्यापैकी प्रत्यक्षात ६९ टक्के मतदान झाले होते. म्हणजेच ४९४ जणांनी मतदान केले होते. या केंद्रावर ३०३ पुरुष आणि २९३ स्त्री मतदार आहेत.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019buldhana-pcबुलडाणाVotingमतदानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक