लखनौ : उत्तर प्रदेशच्या सहा माजी मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवलेले शासकीय बंगले रिकामे करावेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली मुदत ३ जून रोजी संपत आहे. ते लक्षात घेऊन मुलायमसिंह यादव, राजनाथसिंह, कल्याणसिंह, अखिलेश यादव या चार माजी मुख्यमंत्र्यांनी हे बंगले रिकामे करण्याची तयारी दाखविली आहे. मात्र मायावती, नारायणदत्त तिवारी यांनी याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश सरकारच्या मालमत्ता विभागाने या सहा जणांना नोटिसा बजावल्या होत्या. नारायण दत्त तिवारी यांचे हे अतिशय आजारी आहेत. त्यामुळे सरकारी बंगला सोडण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी विनंती त्यांची पत्नी उज्ज्वला यांनी राज्य सरकारकडे केली आहे.कांशीराम स्मारकासाठी बसपाचे प्रयत्नमायावतींना माजी मुख्यमंत्री या नात्याने १३ ए मॉल अॅव्हेन्यू बंगला राहाण्यास दिला होता. लालबहादूर शास्त्री मार्गावरील बंगला त्यांनी बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना १३ ए मॉल अॅव्हेन्यू बंगला रिकामा करावाच लागेल असेही उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे.या बंगल्याचे कांशीराम स्मारकस्थळात २०११ साली रूपांतर करण्यात आले होते असा दावा बसपाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन केला होता.बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी लखनौ येथील १३ ए मॉल अॅव्हेन्यू हा बंगला बसपाचे संस्थापक कांशीराम यांचे स्मारक आहे आणि लालबहादूर शास्त्री मार्गावरील ६ क्रमांकाचा जो बंगला मला राहण्यासाठी दिला होता, जो आपण रिकामा केला आहे असा दावा केला होता.उत्तर प्रदेश सरकारला हा दावा मान्य नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत न्यायालय काय भूमिका घेते, हे पाहणे गरजेचे आहे.
सरकारी बंगले सोडण्यास चार माजी मुख्यमंत्री तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 4:52 AM