आंतरराष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलेल्या महाराष्ट्रातील नेरळ-माथेरानरेल्वे मार्गासह चार अन्य मार्गांचं खासगीकर करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलं आहे. यामध्ये नेरळ-माथेरान यासह हिमाचल प्रदेशमधील हेरिटेज दर्जा असलेला कालका-शिमला रेल्वे मार्ग, पश्चिम बंगालमधील सिलिगुडी-दार्जिलिंग आणि तामिळनाडूतील नीलगिरी या रेल्वेमार्गांचं खासगीकरण करण्यात येणार आहे. या मार्गांवर वर्षाला १०० कोटी रूपयांचं नुकसान होत असल्यानं या मार्गांच खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशच्या या मार्गिकेचं खासगीकरण करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर यावर राजकारणही सुरू झालं आहे. काँग्रेसच्या ताही नेत्यांनी कालका-शिमला रेल्वे मार्गाच्या खासगीकरणाच्या वृत्तांवर आक्षेपही घेतला. खासगी संस्था या ट्रेनची देखभाल करण्यासोबतच मार्केटिंग करण्याचंही काम करणार आहेत. याव्यतिरिक्त नव्या ट्रेनदेखील या मार्गांवर चालवण्यात येतील. या संस्थांना यातून जो महसूल मिळेल त्यातील काही भाग रेल्वेलाही दिला जाणार आहे. याव्यतिरिक्त रेल्वेनं चारही मार्गांचं अध्ययन आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) मोडवर देण्याची जबाबदारी रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीला सोपवली आहे. सध्या या मार्गिकेंचं अध्ययन सुरू करण्यात आलं आहे. तसंत संस्थांना कोणत्या अटी शर्थींवर ही जबाबदारी सोपवायची आहे याची माहिती ही संस्था चार महिन्यांत देईल. सद्यस्थितीत या मार्गांवर ट्रेन चालवण्यासाठी रेल्वेकडे बजेट नाही. अशातच हे मार्ग आता खासगी कंपन्यांकडे सोपवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.सध्या हे चारही मार्ग तोट्यात सुरू आहेत. प्रत्येक वर्षी या मार्गांवर रेल्वे सेवा देण्यासाठी तोटा सहन करावा लागतो. जर हे मार्ग पीपीपी तत्त्वावर देण्यात आले तर यामुळेही महसूलातही वाढ होणार असल्याचं आरएलडीएचे अध्यक्ष वेद प्रकाश यांनी सांगितलं. भारतात अधिक हेरिटेज ट्रॅकभारतात सिंगापुरपेक्षाही अधिक चांगले हेरिटेज मार्ग आहेत. असं असलं तरी प्रत्येक जण सिंगापुरकडेच पर्यटनासाठी जातो. भारतात जे हेरिटेज मार्ग आहेत त्यांचं योग्यरित्या मार्केटिंग केलं जात नसल्यांचंही म्हटलं जातं. तसंच परदेशी नागरिकांनाही उत्तम पॅकेज मिळत नाही. त्यामुळे खासगी कंपन्या यावर काम करून पर्यटनाला चालना देतील असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रातील नेरळ-माथेरानसह चार हेरिटेज रेल्वे मार्गांचं खासगीकरण करण्याच्या तयारीत मोदी सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 5:01 PM
Heritage Railway : युनेस्कोकडून या चारही मार्गांची जागतिक वारसा म्हणून करण्यात आली होती घोषणा
ठळक मुद्देयुनेस्कोकडून या चारही मार्गांची जागतिक वारसा म्हणून करण्यात आली होती घोषणावर्षाला होत असलेल्या १०० कोटींच्या तोट्यामुळे खासगीकरणाचा निर्णय