शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

हल्ल्यामागे जैशचे चौघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2016 3:24 AM

पठाणकोट हवाई तळावरील हल्ला घडवून आणण्यामागे जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ अब्दुल रौफ असगर या दोघांसह चौघांचा

नवी दिल्ली : पठाणकोट हवाई तळावरील हल्ला घडवून आणण्यामागे जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ अब्दुल रौफ असगर या दोघांसह चौघांचा समावेश असल्याचा दावा भारताने गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या हवाल्याने केला आहे. असगर हा आयसी-८१४ या विमानाच्या कंदहार अपहरण प्रकरणाचा सूत्रधार होता.लाहोरजवळ या हल्ल्याचा कट रचल्याचा दावाही तपास संस्थेने केला असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी स्पष्ट केले. हल्ल्यात सहभागी चौघांबाबत विस्तृत माहिती पाकिस्तानला योग्य माध्यमातून पुरविण्यात आली आहे. पठाणकोट हल्ल्यातील कटकर्त्यांवर ठोस कारवाई हीच पाकिस्तानसोबतची भविष्यातील चर्चेसाठी अट राहील, असा दावाही सूत्रांनी केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासेर खान जानजुआ यांच्याशी या मुद्यावर चर्चा करतानाच आवाजाचे नमुने आणि पुरावे सादर केले आहेत.कंदहार विमान प्रकरणाचा सूत्रधार होता असगरपठाणकोट हल्ल्यातील कटकर्त्यांमध्ये अझर, रौफ, अशफाक आणि कासीम या चौघांच्या नावांची ओळख पटविण्यात आली आहे. अब्दुल रौफ असगर हा १९९९ मध्ये भारताच्या आयसी-८१४ या विमानाचे कंदहारला अपहरण करण्यात मुख्य सूत्रधार होता. अतिरेकी अझहर याच्यासह तीन अतिरेक्यांची भारतीय कारागृहातून सोडण्याच्या बदल्यात प्रवाशांची मुक्तता करण्यात आल्यानंतर ओलिस नाट्यावर पडदा पडला होता. या चौघांना ताब्यात देण्याची मागणी भारताने केली आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)चर्चा पुन्हा वांध्यात : निर्णायक कारवाई करा; भारताने ठणकावलेपठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा सहभाग असल्याची गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेली माहिती आम्ही पुरविली आहे, आता तडकाफडकी कारवार्ई करा, त्यावरच चर्चा निर्भर राहील, असे भारताने ठणकावले आहे.हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकशी होऊ घातलेली सचिव स्तरावरील चर्चा पुन्हा वांध्यात सापडली आहे.विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रपरिषदेत भारताची भूमिका मांडली. मात्र पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार करूनही त्यांनी चर्चा होणार की नाही याबाबत भाष्य टाळले. चर्चा होण्यासाठी आणखी आठ दिवस आहेत, असे उद्गारही त्यांनी काढले. पाकिस्तानने ठोस कारवाई करावी सरकारने म्हटले असले तरी त्यासाठी कालमर्यादा ठरवून दिली नाही, असेही ते म्हणाले. पाकिस्तानसह शेजारी देशांसोबत आमचे संबंध मैत्रीपूर्ण राहातील; मात्र आम्ही सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया खपवून घेणार नाही. बँकॉक येथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर व्यापक चर्चा झाल्यानंतर आम्ही पाकिस्तानसोबत मैत्रीचा हात समोर केला आहे.गुरुदासपूर, पठाणकोटमध्ये अतिसतर्कतेचे आदेश जारीगुरुदासपूरपासून जवळच असलेल्या एका गावातील नागरिकांनी लष्कराच्या पोशाखातील दोन संशयित इसमांना बघितल्याची सूचना दिल्यावर सुरक्षा दल सतर्क झाले असून तिबरी लष्करी छावणी आणि आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.तिबरी छावणी परिसरात संपूर्ण घेराबंदी करण्यात आली आहे. परंतु अद्याप सुरक्षा दलांना कुठल्याही संशयित हालचाली दिसल्या नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुरप्रीतसिंग तूर यांनी दिली.